अखेर ठरल्या दिवशीच रिलीज होणार पद्मावती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 09:08 AM2017-11-11T09:08:20+5:302017-11-11T14:38:34+5:30

संजय लीला भन्साळींच्या पद्मावती’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाने हा चेंडू सेन्सॉर बोर्डच्या ...

Padmavati will be released soon after the release | अखेर ठरल्या दिवशीच रिलीज होणार पद्मावती

अखेर ठरल्या दिवशीच रिलीज होणार पद्मावती

googlenewsNext
जय लीला भन्साळींच्या पद्मावती’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाने हा चेंडू सेन्सॉर बोर्डच्या कोर्टात ढकलला होता.  
आता प्रश्न हा आहे की सेन्सॉर बोर्ड काही काटछाट न करता पद्मावती रिलीज करायला परवानगी देईल का?  तर याचे उत्तर मिळाले आहे.  सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशींनी  शुक्रवारी सांगितले की, आम्ही निर्माता संजय लीला भन्साळींचा आदर करतो ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की त्याच्या चित्रपटात अडथळा येतो आहे. सीबीएफसी पॅनलवरचे सदस्य आपला व्यक्तिगत दृष्टीकोन व्यक्त करतायेत. 

पण सेन्सॉर बोर्डाच्या इतर सदस्यांनी यावर बोलायण्यास नकार दिला आहे, तर बीजेपीचे नेता आणि सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अर्जुन गुप्तांनी भन्साळींवर राजद्रोही म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र पाठवून भन्साळींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 

१डिसेंबरला पद्मावती चित्रपट रिलीज होत आहे. मात्र  सुरुवातीपासूनच काही सामाजिक संघटना चित्रपट बंद पाडण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा असा आरोप आहे की, भन्साळींनी चित्रपटात राणी पद्मावतीला चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. पण संजय लीला भन्साळींनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, असे काही या चित्रपटात दाखवण्यात आलेले नाही. ज्या संघटना या चित्रपटाचा विरोध करतायेत. त्यांनी एकदा चित्रपट पाहून घ्यावा. याआधी देखील त्यांनी एक व्हिडिओव्दारे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता.  मी ‘पद्मावती’ अतिशय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने बनवला आहे. राणी पद्मावतीची कथा मला नेहमीच प्रेरित करत आली आहे. तिचे शौर्य, आत्मबलिदानापुढे मी नतमस्तक होत आलोय. पण काही अफवांमुळे ‘पद्मावती’ला विरोध होत आहे. राणी पद्मावती व अलाऊद्दीन खिल्जी यांच्यावर चित्रपटात कुठलाही प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आलेला नाही. मी याआधीही असे कुठले दृश्य चित्रपटात असल्याचा इन्कार केला आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कुणाच्याही भावना दुखावतील, असे काहीही चित्रपटात नाही. चित्रपट साकारताना आम्ही राजपुत घराणेशाहीची मानमर्यादा राखली आहे, असे त्यांनी या व्हिडिओ म्हटले आहे.

ALSO READ :  ​‘पद्मावती’तील रूबाबदार शाहिद कपूर तुम्ही पाहिलातं?

Web Title: Padmavati will be released soon after the release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.