​‘पद्मावती’च्या एका दृश्यावर खर्च होणार १२ कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 06:24 PM2016-10-28T18:24:29+5:302016-10-28T18:24:29+5:30

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’कडे पे्रक्षक डोळे लावून बसले आहेत. ‘बाजीराव मस्तानी’प्रमाणेच ‘पद्मावती’ हा भन्साळींचा महत्त्वांक्षी चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल ...

'Padmavati' will cost 12 crores at one cost! | ​‘पद्मावती’च्या एका दृश्यावर खर्च होणार १२ कोटी!

​‘पद्मावती’च्या एका दृश्यावर खर्च होणार १२ कोटी!

googlenewsNext
जय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’कडे पे्रक्षक डोळे लावून बसले आहेत. ‘बाजीराव मस्तानी’प्रमाणेच ‘पद्मावती’ हा भन्साळींचा महत्त्वांक्षी चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल कुठलीही तडजोड स्वीकारायची भन्साळींची तयारी नाही. बजेटच्या बाबतही त्यांना कुठलीही तडजोड नकोय. येत्या ५ नोव्हेंबरपासून चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे. सूत्रांच्या मते, शूटींगचे पहिलेच शेड्यूल रणवीर सिंह याच्या युद्धाने सुरु होत आहे आणि या एका क्लायमॅक्स सीक्वेंससाठी भन्साळींनी १२ कोटी रूपयांचे बजेट ठेवले आहे. एकूण चित्रपटाचा बजेट विचाराल तर ते सुमारे १९० ते २०० कोटींचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी भन्साळींनी एका मोठ्या फिल्म कार्पोरेटसोबत हातमिळवणी केली आहे. म्हणजेच हा चित्रपट हिट व्हायला असेल तर बॉक्स आॅफिसवर त्याला २५० कोटींची कमाई करावी लागेल. एका सीन्ससाठी इतका मोठा बजेट पाहून हा चित्रपट किती भव्य-दिव्य असणार, याची कल्पना तुम्हाला आलीच असेलच.

खरे तर भन्साळींचा प्रत्येक चित्रपट भव्य-दिव्य असतो. त्यांच्या काही चित्रपटावरून नजर टाकल्यानंतर हे कळते.

बाजीराव मस्तानी : १२० कोटी




‘पद्मावती’पूर्वी भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ आला आणि प्रचंड गाजला. या चित्रपटाचा बजेट १०० कोटींपार गेला. पण हे सगळे पैसे वसूल झालेत. चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमालीची गाजला.

गोलियों की रासलीला-रामलीला : ८५ कोटी



दीपिका आणि रणवीर यांच्या जोडीला घेऊन बनवलेला ‘गोलियों की रासलीला-रामलीला ’ हा चित्रपटही मोठ्या बजेटसह साकाण्यात आला. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावला आणि बॉक्सआॅफिसवर सुपरहिट ठरला.

  देवदास : ५० कोटी



शाहरूख खान, ऐश्वर्या राय  आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेला ‘देवदास’ हा भन्साळींचा चित्रपटही त्या काळातील सर्वाधिक महाग चित्रपट ठरला होता. १००२ मध्ये आलेल्या या चित्रपटाचा बजेट होता ५० कोटींचा.

 गुजारिश : ५० कोटी



 सन २०१० मध्ये हृतिक रोशन, ऐश्वर्या राय यांचा ‘गुजारिश’ आला. ५० कोटी खर्च करून भन्साळींनी हा चित्रपट साकारला. पण दुर्दैवाने बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला.

सावरियां: ४० कोटी



रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांचा डेब्य सिनेमा म्हणजे ‘सावरियां’. २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटासाठी भन्साळींनी ४० कोटी खर्च केले. पण हाही चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला.

Web Title: 'Padmavati' will cost 12 crores at one cost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.