१ डिसेंबरला रिलीज होणार नाही ‘पद्मावती’, वाढत्या विरोधामुळे निर्मात्यांनी घेतला निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 11:10 AM2017-11-19T11:10:34+5:302017-11-19T16:44:20+5:30

राजपूत संघटनांकडून होत असलेला तीव्र विरोध लक्षात घेता ‘पद्मावती’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. वाचा सविस्तर!

Padmavati will not be released on December 1, decision taken due to increasing opposition! | १ डिसेंबरला रिलीज होणार नाही ‘पद्मावती’, वाढत्या विरोधामुळे निर्मात्यांनी घेतला निर्णय!

१ डिसेंबरला रिलीज होणार नाही ‘पद्मावती’, वाढत्या विरोधामुळे निर्मात्यांनी घेतला निर्णय!

googlenewsNext
ल्या काही दिवसांपासून गाजत असलेला ‘पद्मावती’ वाद दिवसेंदिवस आणखी चिखळत असल्याने निर्मात्यांनी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट एक डिसेंबर रोजी रिलीज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पीटीआय या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, वायकॉम १८ या चित्रपट निर्माता कंपनीने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर चित्रपट केव्हा प्रदर्शित केला जाईल याबाबतचा कुठलाही खुलासा केला नाही. 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ला गेल्या काही दिवसांपासून राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे. भन्साळीसह अभिनेत्री दीपिका पादुकोणला मारण्याच्या धमक्याही या संघटनांकडून देण्यात आल्या आहेत. त्यातच सेन्सॉर बोर्डाने अद्यापपर्यंत चित्रपटाला सर्टिफिकेट दिले नसल्याने अन् चित्रपटाचे मीडिया स्क्रिनिंग केल्यामुळे सेन्सॉरचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे.  



दरम्यान, ‘पद्मावती’ला वाढता विरोध लक्षात घेऊन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिले असून, त्यामध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती ईरानी यांना आग्रह करण्यात आला की, जोपर्यंत चित्रपटात योग्य ते बदल केले जात नाहीत, तोपर्यंत चित्रपट रिलीज केला जाऊ नये. जेणेकरून एका समुदायाच्या भावनांचा अवमान होणार नाही, असे पत्रात नमूद केले आहे. 

त्याचबरोबर करणी सेनेचा वाढता विरोध लक्षात घेऊन सेन्सॉर बोर्डानेही सर्टिफिकेट देण्यास असहमती दर्शविली होती. काही तांत्रिक उणिवा लक्षात घेऊन सेन्सॉर चित्रपट बघण्यास नकार दिल्याचे समोर आले होते. बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी सांगितले की, ‘रिव्ह्यूकरिता याच आठवड्यात चित्रपटाचा अर्ज बोर्डाला प्राप्त झाला आहे. तसेच निर्मात्यांनी स्वत:च मान्य केले की हा अर्ज अर्धवट आहे. हा चित्रपट काल्पनिक आहे की, ऐतिहासिक याचादेखील त्यात उल्लेख नव्हता. त्यामुळे बोर्डाने सर्टिफिकेट देण्यास असहमती दर्शविली. दरम्यान, बोर्डाच्या या निर्णयावर बोर्ड जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Web Title: Padmavati will not be released on December 1, decision taken due to increasing opposition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.