​‘पद्मावती’चे ‘पद्मावत’ होऊनही वाद थांबेना! राजघराण्याने केले सेन्सॉर बोर्डाला लक्ष्य!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 10:57 AM2018-01-01T10:57:19+5:302018-01-01T16:27:19+5:30

संजय लीला भन्साळी यांचा ड्रिम प्रोजेक्ट ‘पद्मावती’बद्दलचा वाद अद्यापही थांबायची चिन्हे नाहीत. सेन्सॉर बोर्डाचे पाच कट्ससोबत चित्रपटाला हिरवी झेंडी ...

Padmavati's 'Padmavat' despite the controversy! Dynasty targets the sensor board !! | ​‘पद्मावती’चे ‘पद्मावत’ होऊनही वाद थांबेना! राजघराण्याने केले सेन्सॉर बोर्डाला लक्ष्य!!

​‘पद्मावती’चे ‘पद्मावत’ होऊनही वाद थांबेना! राजघराण्याने केले सेन्सॉर बोर्डाला लक्ष्य!!

googlenewsNext
जय लीला भन्साळी यांचा ड्रिम प्रोजेक्ट ‘पद्मावती’बद्दलचा वाद अद्यापही थांबायची चिन्हे नाहीत. सेन्सॉर बोर्डाचे पाच कट्ससोबत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. तोडगा काढण्याच्या प्रयत्नात  ‘पद्मावती’चे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यावरही भन्साळी राजी झालेत. एवढेच नाही तर चित्रपटातील ‘घूमर’ गाण्यात काही बदल करण्याची तयारीही भन्साळींनी दर्शवली. पण कदाचित इतके करूनही या चित्रपटाला विरोध करणाºयांचे समाधान झालेले नाही. कारण आता मेवाडच्या पूर्वाश्रमीच्या राजघराण्याने यानिमित्ताने सेन्सॉर बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या राजघराण्याचे सदस्य विश्वराज सिंह यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना लक्ष्य केले आहे.
सेन्सॉर बोर्डाने आम्हाला अंधारात ठेवून चित्रपटाबद्दल निर्णय घेतला, असा आरोप विश्वराज यांनी केला आहे. शिवाय यासंदर्भात केंद्रीय प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिले आहे. सेन्सॉर बोर्डाने सहा सदस्यीय समितीला बोलवले होते.  आधी ‘पद्मावती’ सहा सदस्यीय समितीला दाखवण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र असे न करता सेन्सॉर बोर्डाने घाईघाईत निर्णय घेतला. केवळ तीन लोकांनाच चित्रपट दाखवून चित्रपटाला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. आम्ही ‘पद्मावती’संदर्भात काही शंका उपस्थित केल्या होत्या. पण सेन्सॉर बोर्डाने त्याकडेही पुरते दुर्लक्ष केले, असे या पत्रात विश्वराज सिंह यांनी लिहिले आहे.
भन्साळींना ‘पद्मावती’ बनवण्यास जवळपास दोन वर्षे लागलीत. पण   पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत, सर्वप्रथम राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या सेटवर धिंगाणा घातला. यावेळी भन्साळींना मारहाणही करण्यात आली. यानंतर चित्रपटाचा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला. पण इथेही काही अज्ञातांनी सेटवर आग लावली. आता तर हा चित्रपट रिलीज होऊच देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

Web Title: Padmavati's 'Padmavat' despite the controversy! Dynasty targets the sensor board !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.