​या चित्रपटाने घेतला पद्मावतीचा धसका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 11:58 AM2018-01-08T11:58:57+5:302018-01-08T17:28:57+5:30

पद्मावती हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली होती. हा चित्रपट आता २६ जानेवारीला प्रदर्शित होणार असून ...

Padmavati's painting took place in this film | ​या चित्रपटाने घेतला पद्मावतीचा धसका

​या चित्रपटाने घेतला पद्मावतीचा धसका

googlenewsNext
्मावती हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली होती. हा चित्रपट आता २६ जानेवारीला प्रदर्शित होणार असून पॅडमॅन आणि पद्मावती या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर आपल्याला टक्कर पाहायला मिळणार आहे. पद्मावती या चित्रपटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच वाद सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटातील घुमर... हे गाणे तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवेल असे सगळ्यांना वाटत आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय कुमारने एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही. त्यामुळे त्याचा पॅडमॅन देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल असे म्हटले जात आहे. पॅडमॅनमध्ये राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. या दोन चित्रपटांसोबतच अय्यारी हा चित्रपट देखील २६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाने पद्मावतीचा धसका घेतला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. 

Aiyaary


अय्यारी या चित्रपटांची स्टार कास्ट तगडी आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी, नसिरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्ली, लंडन, काश्मीर या ठिकाणी झालेले आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे करत असून त्याने आजवर वेन्सडे, स्पेशल २६, एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज करत असल्याने आणि या चित्रपटाची स्टारकास्ट खूपच चांगली असल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल असे सगळ्यांना वाटत आहे. पण या चित्रपटाने आता पॅडमॅन आणि पद्मावतीसोबत बॉक्स ऑफिसवर क्लॅश न होण्याचे ठरवले आहे. हा चित्रपट २६ जानेवारीला नव्हे तर नऊ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला आहे. फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आता अय्यारी हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

Also Read : करणी सेनेचा ‘पद्मावत’लाही विरोध; भाजपा सरकार अन् सेन्सॉर बोर्डाला दिला इशारा!

Web Title: Padmavati's painting took place in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.