पद्मावतची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे,जाणून घ्या खिल्जीच्या सिंहासनासह कसे घडले इतर ३५ सेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 10:03 AM2018-02-05T10:03:31+5:302018-02-05T15:35:05+5:30

अनेक वाद,संकटं,कट्स यानंतर संजय लीला भन्साली यांचा पद्मावत हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला. २५ जानेवारीला रिलीज झालेल्या या सिनेमाला ...

Padmavat's box office worth crores of crores, Learn how the other 35 sets happened with Khilji's throne | पद्मावतची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे,जाणून घ्या खिल्जीच्या सिंहासनासह कसे घडले इतर ३५ सेट्स

पद्मावतची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे,जाणून घ्या खिल्जीच्या सिंहासनासह कसे घडले इतर ३५ सेट्स

googlenewsNext
ेक वाद,संकटं,कट्स यानंतर संजय लीला भन्साली यांचा पद्मावत हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला. २५ जानेवारीला रिलीज झालेल्या या सिनेमाला रसिकांचा तुफान प्रतिसाद लाभतोय.राणी पद्मावती,अलाऊद्दीन खिलजी आणि राजा रतन सिंह यांच्या अवतीभवती फिरणा-या पद्मावत सिनेमाच्या कथेला रसिकांनी डोक्यावर घेत विरोधकांना चपराक लगावल्याचे बोललं जात आहे.(Also Read:‘पद्मावत’ ठरला रणवीर अन् शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!)




रसिकांच्या या प्रेमामुळेच या सिनेमाने तिकीट खिडकीवर आतापर्यंत १६६.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.कलाकारांचा दमदार अभिनय आणि संजय लीला भन्साली टच यामुळे सिनेमा रसिकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. संजय लीला भन्साली यांचा सिनेमा म्हटला की भव्य दिव्यता ओघाने आलीच.पद्मावत सिनेमाबाबतही तेच घडले आहे. हा सिनेमा भव्य दिव्य वाटावा यायाठी भन्सालींनी कोणतीही कसर सोडलेली नाही.



हा सिनेमा मध्यकालीन कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या महाकाव्यावर आधारित आहे.ऐतिहासिक मंदिर आणि महाल दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हा सिनेमा 35 कोटींच्या 35 सेटवर शूट करण्यात आला.पद्मावतसाठी 35 सेट तयार केले होते. फिल्मसिटीत जवळपास 1 एकर भागात हा सेट तयार केला होता.



फिल्मसिटीतील 35 सेट्समध्ये चित्तोडचा किल्ला, शिव मंदिर, दिल्ली दरबार, जंगल, गुहा, जलालुद्दीन खिल्जीचे घर इत्यादी बनवले होते. 
हा भव्यदिव्य सेट तयार करण्यासाठी जवळपास 50 दिवस लागल्याचे बोलले जाते.




हे सिंहासन तयार करण्यासाठी बराच वेळ लागल्याचे सांगण्यात येते. या सिंहासनाबाबत भन्सालींच्या डोक्यात काही वेगळीच कल्पना होती.त्यामुळे त्यांच्या कल्पनेतलं सिंहासन साकारण्यासाठी सेट डिझायनरला बरीच मेहनत करावी लागली.सिंहासन रिअल वाटावे हे भन्सालींना हवं होतं. त्यामुळे खिल्जीचे सिंहासन फायबरऐवजी लाकडाने तयार केले होते.



तर लहान-लहान डिझाइन बनवण्यासाठी 20 दिवस लागले होते. यांत सगळ्यात आव्हानात्मक होते ते खिल्जीचे सिंहासन तयार करणे.हे बनवण्यासाठी 20 दिवस लागले.


या सिनेमाचे शूटिंग अबुधाबीतही होणार होतं.मात्र ते ऐनवेळी रद्द झाल्याने ते सीन्स कोल्हापुरात शूट करण्यात आले. यातील काही सीन्स जयोल्हापुरातील जयगड किल्ल्यावर शूट करण्यात आले.



इथं खिल्जीची सेना नमाज पठन करताना दाखवण्यात आली.ऐतिहासिक पार्श्वभूमी,त्याला राजपूत संस्कृतीची झलक तसंच रणभूमीतील युद्ध आणि षडयंत्र या सगळ्याचा संगम म्हणजे पद्मावत.संजय लीला भन्सालीच्या सिनेमाला साजेसा भव्यदिव्यपणा,सारं काही डोळे दिपवणारं पद्मावतमध्ये पाहायला मिळत असून रसिकांनाही ते भावतंय.

Web Title: Padmavat's box office worth crores of crores, Learn how the other 35 sets happened with Khilji's throne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.