एका हट्टापायी उद्धवस्त झालं अभिनेत्रीचं करिअर, उदरनिर्वाह करण्यासाठी दागिने विकून चालवलं घर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 12:06 PM2023-05-11T12:06:29+5:302023-05-11T12:09:59+5:30
काम नसल्यामुळे अभिनेत्री जवळचे पैसे संपले, उदरनिर्वाह करण्यासाठी तिने मग दागिने विकले.
'पेज 3', 'रागिनी एमएमएस 2', 'द अँग्री देवी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री संध्या मृदुलला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अनेक दमदार व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अलीकडेच ती ताज या वेब सीरिजमध्येही दिसली होती. पण वर्षानुवर्षे अभिनय क्षेत्राशी जोडलेल्या संध्याने आजवर खूप संघर्ष केला आहे. तिच्या आयुष्यात एक अशी ही वेळ आली होती जेव्हा तिने दागिने विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला होता.
संध्या मृदुलने तिच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. पण मध्येच एक वेळ अशी आली जेव्हा ती लाइमलाइटपासून दूर होती. अलीकडेच 'जी5' या वेब सीरिजमधून अभिनेत्री ताजमध्ये दिसली होती. या मालिकेत तिने सम्राट अकबराच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राणी जोधाची भूमिका साकारली होती. या सिरीजच्या प्रमोशन दरम्यान एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संध्याने तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले. संध्या म्हणाली, वर्षानुवर्षे काम केल्यानंतरही माझ्याकडे राहीच नव्हते.
संध्या मुलाखतीत सांगितले की, 'पेज 3' केल्यानंतर तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. यानंतर त्याच्या आयुष्यात एक दिवस असाही आला जेव्हा त्याला काय करावे आणि काय नाही समजत नव्हते. 'पेज 3' नंतर तो इतका स्टिरियोटाइप झाली की तिला अशाच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर मिळू लागल्या. तिला काहीतरी वेगळं करायचं होते म्हणून तिने अनेक भूमिका नाकाराल्या.
फार कमी लोकांना माहित असेल की, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी संध्याने एका मोठ्या पदावर कार्यरत होती. नोकरी सोडल्यानंतरच ती अभिनेत्री झाली. कारण तिला नोकरी कधीच करायची नव्हती. कारण अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न तिनं सुरुवातीपासूनच पाहिलं होतं. तिच्या कारकिर्दीत अनेक वर्षा तिनं अजिबात काम केले नाही.
काम नसल्यामुळे तिच्या जवळचे पैसे संपले यानंतर तिनं काय केलं याबद्दल सांगताना संध्या म्हणाली, 'जेव्हा माझ्याजवळचे पैसे संपले तेव्हा मी माझे दागिने विकले. बरेच दागिने होते जे मी वापरते नव्हते, मी ते विकले आणि पुढे गेले. माझ्या आवडीचे काम मिळत नाही तोपर्यंत करायचे नाही. खरं तर त्यावेळी जगणं कठीण झालं होतं, मग मी माझा खर्च कमी केले, माझं बाहेर जाणं कमी केले, पण हार मानली नाही.