सगळ्यांशी पंगा घे, माझ्याशी नको! पहलाज निहलानींची कंगना राणौतला तंबी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:06 AM2019-03-29T10:06:23+5:302019-03-29T10:09:08+5:30
स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा कंगना राणौतने केला आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली.निहलाली यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आणि अपेक्षेनुसार, निहलानी यांनी यावर अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली.
ठळक मुद्देमाझा चित्रपट पोर्न चित्रपट नव्हताच. ना मला अशा चित्रपटांत रस आहे,’असेही निहलानी म्हणाले.
स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा कंगना राणौतने केला आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पंकज निहलानी यांच्यावरच्या कंगनाच्या या आरोपाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. निहलाली यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आणि अपेक्षेनुसार, निहलानी यांनी यावर अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली. केवळ इतकेच नाही तर सगळ्यांशी पंगा घे, माझ्याशी नको, अशी तंबीही कंगनाला दिली.
‘मी चित्रपटांच्या फोटोशूटसाठी दीड कोटी रूपये खर्च केले होते. कंगनाने फोटोशूट केले. माझ्या याच फोटोशूटमुे महेश भट यांचा ‘गँगस्टर’ हा सिनेमा तिला मिळाला. ‘गँगस्टर’ मिळाल्यानंतर लगेच तिने माझा चित्रपट करण्यास टाळाटाळ सुरु केली. मला आधी ‘गँगस्टर’ करू द्या, अशा विनवण्या तिने केल्या. कंगनाने माझ्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. कारण तिने असे केले तर माझ्याकडे तिच्याशी खेळण्यासाठी बरेच काही आहे,’ असे पहलाज निहलानी म्हणाले.
‘कंगनासोबतचा साईन केलेला माझा चित्रपट युथ चित्रपट होता. त्या चित्रपटात ती विवाहितेच्या भूमिकेत होती. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांच्याशीही संपर्क साधला होता. हा चित्रपट ‘चीनी कम’च्या धर्तीवर होता. मी अमिताभ यांना कथा ऐकवली होती. पण त्यांनी मला नकार दिला होता. कारण ते अन्य एका प्रोजेक्टमध्ये बिझी होते. माझा चित्रपट पोर्न चित्रपट नव्हताच. ना मला अशा चित्रपटांत रस आहे,’असेही निहलानी म्हणाले.
काय म्हणाली होती कंगना
पहलाज निहलानी यांनी मला एका चित्रपटाची आॅफर दिली होती. या चित्रपटाचे नाव ‘आय लव्ह यू बॉस’ असे होते. या चित्रपटासाठी एक फोटोशूट होणार होते. मला त्यांनी रोब म्हणजेच ट्रान्सपरंट गाऊन घालायला दिला होता. पण त्यासोबत अंर्तवस्त्र नव्हती. मी या चित्रपटात एका मुलीची भूमिका साकारणार होती, जिच्या मनात तिच्या बॉसविषयी लैंगिक भावना आहेत. ती एक सॉफ्ट पोर्न भूमिका होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी हे सगळे ऐकूनच मी हे काम करू शकत नाही असे सांगितले आणि तिथून अक्षरश: पळत काढला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यानंतर मी काही दिवस सगळ्यांपासून लपून राहात होते. मी माझा नंबर देखील बदलला होता, असे कंगनाने म्हटले होते.