काजोलसोबत लिपलॉक सीननंतर पाकिस्तानी अभिनेता म्हणाला, 'ती माझी क्रश, एक पैशाचीही लाज...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:23 AM2023-07-20T10:23:10+5:302023-07-20T10:24:18+5:30

हा सीन करताना अजय देवगण सेटवर हजर नव्हते.

pakistani actor alyy khan says kajol is my crush didnt feel embarassed to do kissing scene with her | काजोलसोबत लिपलॉक सीननंतर पाकिस्तानी अभिनेता म्हणाला, 'ती माझी क्रश, एक पैशाचीही लाज...'

काजोलसोबत लिपलॉक सीननंतर पाकिस्तानी अभिनेता म्हणाला, 'ती माझी क्रश, एक पैशाचीही लाज...'

googlenewsNext

अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द ट्रायल' (The Trial) वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. या सिरीजमधून काजोलने अनेक वर्षांची नो किसिंग पॉलिसी तोडली आहे. तिने सिरीजमध्ये अभिनेता अली खानसोबत किसींग दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या सीनचीच चर्चा आहे. अली खान (Ally Khan) हा पाकिस्तानी अभिनेता असल्याने याची जास्तच चर्चा होत आहे. एका मुलाखतीत अली खानने काजोलसोबतच्या लिपलॉक सीनवर आपली भूमिका मांडली.

यु्ट्यूबर नादिर अली च्या पॉडकास्टमध्ये अली म्हणाला, '90 च्या दशकात काजोल माझी क्रश होती. मला तेव्हापासूनच तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. द ट्रायल मुळे मला ती संधी मिळाली. यात मला तिला किस करायचे होते. स्क्रिप्टनुसार तो एक फ्रेंच किस होता. हा सीन करताना अजय देवगण सेटवर हजर नव्हते. या सीनसाठी आम्ही रिहर्सलही केली. मला हा सीन केल्यामुळे एका पैशाचीही लाज वाटत नाही. कारण सगळंच प्रोफेशनल पद्धतीने शूट करण्यात आलं होतं.'

'द ट्रायल' ही सिरीज एका हाऊसवाईफवर आधारित आहे. जिचा नवरा सेक्स स्कँडलमध्ये फसतो. यानंतर ती मुलांच्या पालनपोषणासाठी पुन्हा वकिली सुरु करते. यामध्ये अभिनेता अली काजोलच्या एक्स बॉयफ्रेंडच्या भूमिकेत आहे ज्याच्या फर्ममध्ये काजोल जॉईन होते.

अली खान याने बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये काम केले आहे. तसंच त्याने ब्रिटीश आणि पाकिस्ततानी टेलिव्हिजनवरही काम केलं आहे. 'मायटी हार्ट',''ट्रेटर','डॉन 2','3 बहादुर' सारख्या सिनेमांमुळे त्याला ओळख मिळाली.

Web Title: pakistani actor alyy khan says kajol is my crush didnt feel embarassed to do kissing scene with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.