आलियाच्या मुलीसाठी आलं पाकिस्तानातून स्थळ, कोण आहे तो मुलगा बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 19:12 IST2022-11-08T19:11:17+5:302022-11-08T19:12:47+5:30

कपूर घराण्यात छोट्या परीचा जन्म झाला आणि आलिया रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव  सुरु झाला. भारतातील चाहते खूष झालेच पण परदेशातुनही शुभेच्छा येऊ लागल्या.

pakistani-actor-yasir-hussain-viral-post-on-alia's-daughter | आलियाच्या मुलीसाठी आलं पाकिस्तानातून स्थळ, कोण आहे तो मुलगा बघा...

आलियाच्या मुलीसाठी आलं पाकिस्तानातून स्थळ, कोण आहे तो मुलगा बघा...

कपूर घराण्यात छोट्या परीचा जन्म झाला आणि आलिया रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव  सुरु झाला. भारतातील चाहते खूष झालेच पण परदेशातुनही शुभेच्छा येऊ लागल्या. आता हेच बघा ना अगदी पाकिस्तानातुनही या छोट्या परीचे स्वागत करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आलियाच्या मुलीसाठी आत्तापासूनच लग्नासाठी स्थळ येण्यास सुरुवात झाली आहे. हे वाचून आश्चर्य वाटले ना?

पाकिस्तानी अभिनेता, व्हीजे आणि सुत्रसंचालक यासिर हुसैन ने हे स्थळ पाठवले असून यामुळे दोन्ही देशात मैत्री होईल असा संदर्भ जोडला आहे. यासिरची इन्टाग्राम पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

काय आहे ही पोस्ट ?
यासिरने पोस्ट मध्ये मुलगा कबीर सोबतचा फोटो टाकला आहे. यावर कॅप्शन दिले आहे,'तेव्हाच आज कबीर खूप खुश आहे. दोन देशांमधील मैत्रीसाठी मी तयार आहे.' ही पोस्ट आल्यानंतर लवकर ही पोस्ट कोणाला समजलीच नाही. पण जसे समजले की यासिर आपल्या मुलासाठी आलियाच्या मुलीचा हात मागत आहे त्यानंतर मात्र ही पोस्ट व्हायरल होण्यास वेळ लागला नाही.

 



यासिर पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता आणि सुत्रसंचालक आहे. २०१९ मध्ये त्याने अभिनेत्री इकरा अजीज सोबत लग्न केले जे खूप चर्चेत होते. तर २०२१ मध्ये त्यांना मुलगा झाला. कबीर हुसैन असे मुलाचे नाव असून याचाच उल्लेख त्याने पोस्ट मध्ये केला आहे.

Web Title: pakistani-actor-yasir-hussain-viral-post-on-alia's-daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.