"म्हणूनच तो किंग कोहली आहे", विराटच्या खेळीनं जिंकलं पाकिस्तानी अभिनेत्रीचं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:47 IST2025-02-24T18:47:03+5:302025-02-24T18:47:21+5:30

पाकिस्तानी सुंदरी कोहलीच्या खेळीची चाहती झाली.

Pakistani Actress Maya Ali Praised Virat Kohli After His Performance In The Icc Champions Trophy 2025 | "म्हणूनच तो किंग कोहली आहे", विराटच्या खेळीनं जिंकलं पाकिस्तानी अभिनेत्रीचं मन

"म्हणूनच तो किंग कोहली आहे", विराटच्या खेळीनं जिंकलं पाकिस्तानी अभिनेत्रीचं मन

 Icc Champions Trophy 2025: भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना दुबईत रविवारी पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र भारतीय गोलंदजांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांना ५० षटकांत २४१ धावच करता आल्या. विजयासाठी अवघ्या २४२ धावांचं लक्ष्य होतं. जे भारतीय संघाने सहा गडी राखत गाठलं. विराट कोहलीने केलेली शतकी खेळी ही महत्त्वाची ठरली. विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवलाय. त्यामुळे विराट कोहलीचं कौतुक होतं आहे. फक्त भारतातचं नाही तर थेट पाकिस्तानातही विराटचं कौतुक होत आहे.

कोहलीच्या शानदार खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. ज्यामध्ये अनेक कलाकारांचा समावेश आहे आणि आता यात एका पाकिस्तानी अभिनेत्रीचं नावही जोडलं गेलं आहे.  पाकिस्तानी सुंदरी कोहलीच्या खेळीची चाहती झाली. अभिनेत्री माया अलीनं अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये कोहलीचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक (Pakistani Actress Maya Ali Praised Virat Kohli) केलं आहे. तिनं लिहलं, "त्याच्याबद्दल अपार आदर आहे. म्हणूनच तो किंग कोहली आहे". 

माया अली ही एक अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिचे इंस्टाग्रामवर ८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. माया अलीच नाही तर विकी कौशल, अनुपम खेर, सोहा अली खान आणि सनी देओल सारख्या अनेक हिंदी चित्रपट कलाकारांनीही कोहलीचं कौतुक केलं आहे.
 

Web Title: Pakistani Actress Maya Ali Praised Virat Kohli After His Performance In The Icc Champions Trophy 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.