म्हणे, आमिर खान आरोपी! पाकिस्तान मीडियाची ‘करामत’, सोशल मीडियावर बोभाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 01:30 PM2020-04-19T13:30:00+5:302020-04-19T13:30:02+5:30
वाचा काय आहे प्रकरण
पाकिस्तानी मीडियाचे किस्से जगभर प्रसिद्ध आहेत. अनेकदा चुकीची, अर्धवट माहिती देऊन पाकिस्तानी मीडियाने स्वत:चे हसे करून घेतले आहे. यामुळे अनेकदा पाकी मीडिया सोशल मीडियावर ट्रोल झाला. पण यामुळे पाकी मीडियाच्या स्वभावात कुठलाही बदल झाला नाही. आता पाकिस्तानी मीडियाने काय करावे तर चक्क एका आरोपीच्या जागी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा फोटो दाखवला.
होय, सध्या यावरून पाकिस्तानी मीडियाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
Headline: After 17 years MQM leader Amir Khan exonerated in a murder case.
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) April 16, 2020
Didn't know Indian actor Amir Khan was in Pakistan for the last 17 years.. pic.twitter.com/YcUmg6LKfk
आता हे संपूर्ण प्रकरण काय हे जाणून घेऊ यात.
तर त्याचे झाले असे की, पाकिस्तानच्या न्यायालयाने 17 वर्षांनंतर राजकीय पार्टी मुहाजिर कौमी आंदोलन-हक्की (MQM) चा नेता आमिर खानची दुहेर हत्या प्रकरणातून मुक्तता केली. हे वृत्त पाकिस्तानी मीडियाने ठळकपणे प्रसिद्ध केले. पण हे वृत्त चॅनेलवर दाखवताना मुहाजिर कौमी आंदोलन-हक्की (MQM)चा नेता आमिर खानच्या जागी बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा फोटो लावून टाकला. पाकिस्तानी मीडियाला थोड्याच वेळात आपली चूक लक्षात आली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण सोशल मीडियावर या चुकीचा बोभाटा झाला होता.
Sleeper cell ka banda hai ye,Sarfarosh movie ke baad se hi RAW ne fit kiya tha udhar😀
— उर्मिला (@PriyankaRaiVns) April 16, 2020
— sanjay shinde (संजय शिंदे) 🇮🇳 (@SanjayShindeG9) April 16, 2020
या वृत्ताचे स्क्रिनशॉट्स सोशलमीडियावर व्हायरल झालेत. मग काय, सोशल मीडियावर पाकिस्तानी मीडिया पुन्हा एकदा थट्टेचा विषय बनले. अनेक मीम्स, जोक्स व्हायरल झालेत.
अद्याप आमिर खानने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण नेटकरी मात्र जोरात आहेत.