न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर या पॉप सिंगरने सोडली इंडस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 12:07 PM2019-11-06T12:07:30+5:302019-11-06T12:08:54+5:30
होय, अलीकडे तिचे न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेत आणि यानंतर तिने इंडस्ट्री सोडत असल्याचे जाहीर केले.
पाकिस्तानची पॉप सिंगर रबी पीरजादा ही कायम चर्चेत असते. मध्यंतरी अंगावर बॉम्ब जॅकेट घालून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर ती चर्चेत आली होती. याच रबीवर आता ग्लॅमरस करिअर सोडण्याची वेळ आली आहे. होय, अलीकडे रबीचे न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेत आणि यानंतर रबीने इंडस्ट्री सोडत असल्याचे जाहीर केले. ‘मी रबी पीरजादा इंडस्ट्री सोडत आहे. अल्लाह, माझ्या पापांना माफी देवो. लोकांच्या माझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलो,’ असे तिने लिहिले.
Geo news has a different style of reporting
— Rabi Pirzada (@Rabipirzada) October 24, 2019
خود کش حملے کی خواہش: رابی پیرزادہ نے پوسٹ ڈیلیٹ کردی https://t.co/BDHPTfom1N
रबीने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. अंगावर बॉम्ब जॅकेट घातलेला एक फोटो ट्विट करत, ‘मोदी हिटलर, मला तुम्हाला मारण्याची इच्छा आहे. काश्मीर की बेटी’, असे तिने लिहिले होते. अलीकडे तिचे काही न्यूड व्हिडीओ व्हायरल झाले होते.
Dare you, can you drive as fast as i can...
— Rabi Pirzada (@Rabipirzada) October 30, 2019
watch the video https://t.co/UUdSDN4cJl
✌🏻#modihitler u can’t run away..#kashmirkibetipic.twitter.com/neOnoygKwh
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याशी वाद झाल्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झालेत अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर असीफ गफूर यांच्याशी तिचे ट्विटरवरून भांडण झाले होते. त्यानंतर तिचे हे व्हिडीओ व्हायरल झालेत होते. या न्यूड व्हिडीओनंतर पाकिस्तानी लोकांनी रबीवर सडकून टीका केली होती. याचमुळे तिचे नाव पाकिस्तानात ट्विटरवर ट्रेंड झाले होते. या वादानंतर रबीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
ایک کشمیری لڑکی کی تیاری مودی کے خلاف، ویسے تو اس نے جہنم میں جانا ہی ہے، مگر اس جیسے انسا ن کی دنیا بھی جہنم ہونی چاہیے۔ #chotisibaathttps://t.co/cGfxSd0hd5pic.twitter.com/h3C9HA1BT0
— Rabi Pirzada (@Rabipirzada) September 2, 2019
गत महिन्यात रबीने काही साप व अजगरांसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि हे साप व अजगर मोदींच्या अंगावर सोडण्याची धमकी दिली होती. यापश्चात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या वन्यजीव संरक्षक विभागाने तिच्याविरोधात कारवाई सुुरू केली होती. शिवाय लाहोरच्या एका न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केला होता.