सैफ अली खानचा लेक इब्राहिम पलक तिवारीला करतोय डेट ?, आता यावर खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:58 PM2022-04-20T15:58:32+5:302022-04-20T15:59:03+5:30

Palak Tiwari : श्वेता तिवारीची लेक पलक सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानला डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Palak Tiwari opens up about being clicked with Ibrahim Ali Khan, says she was hiding from her mom Shweta Tiwari | सैफ अली खानचा लेक इब्राहिम पलक तिवारीला करतोय डेट ?, आता यावर खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

सैफ अली खानचा लेक इब्राहिम पलक तिवारीला करतोय डेट ?, आता यावर खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

googlenewsNext

श्वेता तिवारी(Shweta Tiwari)ची लाडकी मुलगी पलक तिवारी(Palak Tiwari)ने फार कमी कालावधीत सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. पलकचा ग्लॅमरस आणि सिझलिंग लूक सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. पलक तिच्या अभिनय पदार्पणासोबतच सैफ अली खान(Saif Ali Khan)चा मुलगा इब्राहिम खान (Ibrahim Ali Khan) सोबतच्या रिलेशनशीपमुळे खूप चर्चेत आहे.

काही वेळापूर्वी सोशल मीडियावर पलक तिवारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती इब्राहिम अली खानसोबत कारमध्ये बसलेली आणि पापाराझींना पाहून चेहरा लपवताना दिसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता पलकने सांगितले की, इब्राहिम आणि त्यांच्यात काय नाते आहे आणि त्यांच्यातील बॉण्डिंग कसे आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार पलकने सांगितले की, ते दोघे फक्त मित्र आहेत. पलक म्हणाली - ही फक्त मैत्री आहे. लोक असा अंदाज लावत होते, त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही नुकतेच आऊटिंगला गेलो आणि पापाराझींनी आम्हाला कॅमेऱ्यात कैद केले. तिथेच ते संपले.

पलक पुढे म्हणाली की, आमच्या दोघांसोबत इतरही अनेक लोक होते. तिथे फक्त आम्हीच नव्हतो. पण तसे ते दाखवण्यात आले. लोकांनी बनवलेली स्टोरी होती.
जेव्हा पलकला विचारण्यात आले की पापाराझी पाहून तिने चेहरा का लपवला? यावर पलकने उत्तर दिले की, तिची आई श्वेता तिवारीमुळेच चेहरा लपवला होता. कारण तिने तिच्या लोकेशनबद्दल खोटे सांगितले होते.


पलक म्हणाली, माझी आई पापाराझींच्या फोटोंसह माझे लोकेशन ट्रॅक करत असते. त्या रात्री, एक तासापूर्वी, मी तिला सांगितले की मी घराकडे निघाले आहे. त्यावेळी मी वांद्रे येथे होते. मी आईला म्हणाले होते की, इथे खूप ट्रॅफिक आहे. मी रस्त्यात आहे आणि तेव्हा आईने ते फोटो मला पाठवले आणि म्हणाली कुठे आहेस खोटारडी.
पलकने सांगितले की, मी कोणापासून नाही तर केवळ आई श्वेता तिवारीमुळेच चेहरा लपवला होता. त्याचवेळी इब्राहिमबद्दल पलकने सांगितले की, आम्ही चांगले मित्र आहोत. तो खूप गोड मुलगा आहे. आम्ही एकमेकांशी बोलतो कधी कधी एवढेच. पलक म्हणाली की तो सिंगल आहे.

Web Title: Palak Tiwari opens up about being clicked with Ibrahim Ali Khan, says she was hiding from her mom Shweta Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.