इब्राहिमने पतौडी पॅलेसमध्ये केलं पलक तिवारीचं फोटोशूट? कमेंट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:29 PM2024-06-28T12:29:33+5:302024-06-28T12:30:13+5:30

पलक तिवारीने तिचे काही फोटो पोस्ट केले तर त्यावर इब्राहिमनेही कमेंट केली आहे.

Palak Tiwari photoshoot Ibrahim Ali Khan s comment went viral users said this is pataudi palace | इब्राहिमने पतौडी पॅलेसमध्ये केलं पलक तिवारीचं फोटोशूट? कमेंट करत म्हणाला...

इब्राहिमने पतौडी पॅलेसमध्ये केलं पलक तिवारीचं फोटोशूट? कमेंट करत म्हणाला...

बॉलिवूडमध्ये एका स्टारकिड कपलच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. अनेकदा दोघंही डिनरसाठी तर कधी इव्हेंटसाठी हातात हात घालून पोहोचतात. दोघंही स्टारकिड्स असल्याने त्यांची जास्त चर्चा होते. हे कपल आहे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari). इब्राहिमच्या लूक्सवर लाखो मुली फिदा आहेत पण तो मात्र पलकच्या प्रेमात पडला असल्याचं दिसतंय. नुकतेच पलक तिवारीने तिचे काही फोटो पोस्ट केले तर त्यावर इब्राहिमनेही कमेंट केली आहे.

पलक तिवारी हळूहळू इंडस्ट्रीत आपली ओळख बनवत आहे. दुसरीकडे इब्राहिम लवकरच डेब्यू करणार आहे. सध्या  दोघंही अनेकदा एकाच कारमधून डिनर किंवा पार्टीसाठी येतात. काही दिवसांपूर्वी इब्राहिमने पलकला ओढत गाडीत बसवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. इतकंच नाही तर इब्राहिमने आई आणि बहिणीसोबत पलकलाही व्हॅकेशनवर नेले होते. आता पलकने काही फोटो पोस्ट केलेत जे पाहून इब्राहिमलाही कमेंट करण्याचा मोह आवरलेला नाही.  ग्रीन स्वेटशर्ट आणि ग्रे रंगाची ट्रॅकपँट अशा कॅज्युअल लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत. पॅलेससारखं वाटावं अशा ठिकाणी टेरेसवर तिने फोटो काढलेत. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. 

पलकच्या या फोटोंवर इब्राहिमने 'लुकिंग गुड' अशी फायर कमेंट केली आहे. इब्राहिमच्या या कमेंटवर नेटकऱ्यांनीही उड्या मारल्या आहेत. दोघांचं रिलेशनशिप कन्फर्म असं युझर्सने म्हटलं आहे. एकाने तर हे फोटो पटौदी पॅलेसमधले आहेत अशी कमेंट करत लक्ष वेधून घेतलंय. युझर्सने कमेंट सेक्शनमध्ये इब्राहिमची चांगलीच चेष्टा केली आहे.

Web Title: Palak Tiwari photoshoot Ibrahim Ali Khan s comment went viral users said this is pataudi palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.