चित्रपट वाईट असेल तर बॉयकॉटचा संबंधच नसतो.. ; मिर्झापूरच्या कालीन भैय्याचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:28 PM2022-09-08T17:28:09+5:302022-09-08T17:33:51+5:30

बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे आमिर खानचा लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. .यावर पंकज त्रिपाठीनं आपलं मत नोदवलं आहे.

Pankaj Tripathi says bollywood needs selfassessment addresses boycott trend | चित्रपट वाईट असेल तर बॉयकॉटचा संबंधच नसतो.. ; मिर्झापूरच्या कालीन भैय्याचं रोखठोक विधान

चित्रपट वाईट असेल तर बॉयकॉटचा संबंधच नसतो.. ; मिर्झापूरच्या कालीन भैय्याचं रोखठोक विधान

googlenewsNext

Pankaj Tripathi On Boycott Trend: ओंकारा या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारणारा अभिनेता पंकज त्रिपाठी आज हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं नाव आहे. आज पंकज त्रिपाठीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर पंकज त्रिपाठीनं आपलं मतं नोंदवलं आहे. बॉलिवूडला आपल्या कामाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधन यासह अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला.


एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, पंकज त्रिपाठी म्हणाला, "आपण काय बनवत आहोत आणि ते कसे बनवत आहोत याचे आत्म-मूल्यांकन करण्याची गरज आहे. ते करणं आवश्यक आहे. त्याचीच उणीव आहे. बॉयकॉड ट्रेंडवर बोलताना अभिनेता म्हणाला, एखादा चित्रपट वाईट असेल तर तो चालत नाही आणि त्यावर बहिष्कार टाकला जात नाही. लोक सिनेमागृहात जात नाहीत. हाही बहिष्कारच, नाही का? तेव्हा कोणतीही सोशल मीडिया मोहीम नाही आणि हॅशटॅग नाहीत पण तरीही चित्रपट चालत नाही. पण हो, आत्मपरीक्षण गरजेचं आहे."

बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई न करणार्‍या त्यांच्या 83 चित्रपटाबद्दल बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाला, "नाही नाही, मला पश्चात्ताप नाही, माझं थोडे पैसे लागलं होते. पुढे तो म्हणाला, मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आणि त्यानंतर काय होईल हे माझ्या हातात नाही, असे पंकज म्हणाले. 83 रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या स्पोर्ट्स ड्रामाला डिसेंबरमध्ये ओमिक्रॉन ब्रेकआउटचा फटका बसला आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनला फटका बसला. पंकज त्रिपाठी अलीकडेच डिस्ने हॉटस्टारवर सुरू असलेल्या क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच से मध्ये दिसतोय. 

Web Title: Pankaj Tripathi says bollywood needs selfassessment addresses boycott trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.