Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयींवरील बायोपिकला सुरुवात, पंकज त्रिपाठींनी शेअर केला Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 14:21 IST2023-05-07T14:16:52+5:302023-05-07T14:21:16+5:30
मराठी दिग्दर्शक रवि जाधवचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'मै अटल हूँ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. कधी होणार रिलीज?

Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयींवरील बायोपिकला सुरुवात, पंकज त्रिपाठींनी शेअर केला Video
मराठी दिग्दर्शक रवि जाधव (Ravi Jadhav) यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'मै अटल हूँ' (Main Atal Hoon) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. प्रतिभावान अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सिनेमा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत. पंकज त्रिपाठी यांना अटलजींच्या भूमिकेत बघण्यास चाहते उत्सुक आहेत. पंकज त्रिपाठी यांनी शूटिंगला सुरुवात झाल्याची एक झलक दाखवली आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ राजकारणीच नाही तर कविमनाचे होते. त्यांच्या अनेक कविता आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जयंतीनिमित्त 'मै अटल हूँ' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली होती. अटलजींच्या भूमिकेतील पंकज त्रिपाठी यांना बघून चाहते प्रभावित झाले होते. नुकतंच पंकज त्रिपाठी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं दिसून येतंय.
कधी होणार रिलीज ?
डिसेंबर 2023 मध्ये सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी:पॉलिटिशियन अॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित आहे. पंकज त्रिपाठी हे भारतीय सिनेमातील सध्याचे ऑलराऊंडर कालाकार आहेत. त्यांची अटलजींच्या भूमिकेसाठी निवड ही योग्यच वाटते.