Pankaj Tripathi: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा; पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:41 IST2022-11-18T18:15:18+5:302022-11-18T18:41:16+5:30
या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास यातून उलगडणार आहे.

Pankaj Tripathi: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा; पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत अशा चित्रपटांचा एक टप्पा आहे, ज्यांच्या कथा आणि पात्रे राजकारण आणि राजकारण्यांपासून प्रेरित किंवा प्रभावित आहेत. अशाच एका नव्या चित्रपटाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे शीर्षक आहे, 'मैं रहूं या ना रहूं, यह देश रहना चाहिए- अटल'।
शीर्षकानुसार, हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील बायोपिक आहे आणि त्यांची भूमिका अभिनेते पंकज त्रिपाठी साकारणार आहेत. या चित्रपटाचे लेखन उत्कर्ष नैथानी यांनी केले आहे, तर तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावलेले रवी जाधव यांचं दिग्दर्शन आहे. या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास उलगडणार येणार आहे.
अटलजी हे भारतीय राजकारणातील अशा नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी देशाच्या राजकारणावर आपली छाप सोडली आहे. त्यांची बुद्धी आणि बोलण्याची शैली केवळ त्यांच्या मित्रांनाच नव्हे, तर त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना पटली . कवी म्हणूनही त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. जनसंघाच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते होण्यापर्यंत आणि पंतप्रधान होण्यापर्यंतचा अटलजींचा प्रवास प्रेरणादायी आहे. "अटलजींची भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. अशी प्रतिक्रिया पंकज त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान हा बायोपिक 2023 मध्ये वाजपेयी यांच्या 99 व्या जंयतीच्या मूहुर्तावर म्हणजेच 25 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे.