पनवेलच्या शेजाऱ्याने व्हिडीओ काढला; उच्च न्यायालयाने सलमानच्या दाव्यावरील निकाल ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 07:21 AM2022-10-12T07:21:26+5:302022-10-12T07:21:45+5:30

पनवेल येथील फार्महाऊसवर सलमानने केलेल्या हालचालींबद्दल कक्कड यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्याने सलमानने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Panvel's neighbor shot the video; The High Court reserved its judgment on Salman's claim | पनवेलच्या शेजाऱ्याने व्हिडीओ काढला; उच्च न्यायालयाने सलमानच्या दाव्यावरील निकाल ठेवला राखून

पनवेलच्या शेजाऱ्याने व्हिडीओ काढला; उच्च न्यायालयाने सलमानच्या दाव्यावरील निकाल ठेवला राखून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पोस्ट केल्याबद्दल पनवेल येथील शेजारी केतन कक्कड यांचे सोशल अकाउंट ब्लॉक करावे किंवा तात्पुरते निलंबित करण्यास दिवाणी न्यायालयाने नकार दिल्यानंतर अभिनेता सलमान खान उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने या अपिलावरील निर्णय मंगळवारी राखून ठेवला. गेले दोन महिने या अपिलावरील सुनावणी सुरू होती. अखेर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्या. सी. व्ही. भडंग यांच्या एकलपीठाने निकाल राखून ठेवला.

पनवेल येथील फार्महाऊसवर सलमानने केलेल्या हालचालींबद्दल कक्कड यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्याने सलमानने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. बदनामीकारक व्हिडिओ हटविण्याचे आदेश द्यावेत. तसेच त्यांना विधाने करण्यापासून रोखावे, अशी मागणी सलमानने न्यायालयाकडे केली. मात्र, ही मागणी मान्य करण्यास दिवाणी न्यायालयाने नकार दिल्याने सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली.

    ‘लाखोंनी हा व्हिडिओ पाहिला आणि सलमानविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत.  सलमान दाऊद टोळीचा सदस्य असल्याचा आरोपही कक्कड यांनी केला. सलमानच्या फार्महाऊसवर ड्रग्ज, अवयव आणि मुलांची तस्करी करत असल्याचे गंभीर आरोप केल्याचे मानहानी दाव्यात म्हटले आहे. कक्कड यांचे सोशल मीडिया अकाउंट निलंबित करावे व त्यांना बदनामीकारक विधाने करण्यापासून अडविण्यात यावे, अशी अंतरिम मागणी सलमान खानने याचिकेत केली आहे.

Web Title: Panvel's neighbor shot the video; The High Court reserved its judgment on Salman's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.