सतत फ्लॉप होणाºया मुलाला पापा अनिल कपूरने दिला यशाचा मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 09:58 AM2018-06-09T09:58:57+5:302018-06-09T15:28:57+5:30

अभिनेता अनिल कपूरच्या मते, सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर ज्यापद्धतीने करिअरमध्ये पुढे जात आहेत, त्यावरून मी फारसा आनंदी नाही. ...

Papa Anil Kapoor's mantra for the success of a continuous flop | सतत फ्लॉप होणाºया मुलाला पापा अनिल कपूरने दिला यशाचा मंत्र!

सतत फ्लॉप होणाºया मुलाला पापा अनिल कपूरने दिला यशाचा मंत्र!

googlenewsNext
िनेता अनिल कपूरच्या मते, सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर ज्यापद्धतीने करिअरमध्ये पुढे जात आहेत, त्यावरून मी फारसा आनंदी नाही. मात्र याचा मला नक्कीच गर्व वाटतो की, त्यांना आतापर्यंत इंडस्ट्रीत जे काम मिळाले ते त्यांच्या कर्तृत्वावर मिळाले. अनिल कपूरची मुले म्हणून त्यांना काम मिळाले नाही. सोनम कपूरने तिच्या करिअरची सुरुवात २००७ मध्ये आलेल्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून केली, तर हर्षवर्धन कपूरने आतापर्यंत ‘मिर्झिया’ आणि ‘भावेश जोशी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिलने म्हटले की, ‘सातत्य असणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त मानसिक आणि शारीरिकरीत्या स्वत:चा सांभाळ करणेही आवश्यक आहे. मात्र हे करीत असताना धोके पत्करावेच लागतील’, असा यशाचा मंत्रही त्याने विशेष करून मुलगा हर्षवर्धनला दिला. 

पुढे बोलताना अनिलने म्हटले की, ‘मी या दोघांची सर्वांत जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ते कलाकार आहेत. त्यांना एक कलाकार म्हणून ओळखले जाते.’ अनिल कपूर ९०च्या दशकात सर्वांत यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होता. इंडस्ट्रीतील ३५ वर्षांच्या आपल्या करिअरविषयी बोलताना त्याने म्हटले की, ‘मी एक कलाकार म्हणून स्वत:ला समर्पित केले होते. त्यामुळेच इतके वर्ष मी इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करू शकलो. 

अनिलने म्हटले की, ‘पुढच्या काही दिवसांतच मी चित्रपटसृष्टीत ३५ वर्षे पूर्ण करणार आहे. माझी कारकिर्द यशस्वी राहिली आहे. मी असे मानतो की, इतके वर्ष मी इंडस्ट्रीत तग धरून राहिलो म्हणजे नक्कीच मी काहीतरी चांगले कर्म केले असतील.’ दरम्यान, अनिल कपूर लवकरच ‘रेस-३’मध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मोठमोठ्या स्टारच्या भूमिका आहेत. ‘रेस-३’ हा चित्रपट १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Papa Anil Kapoor's mantra for the success of a continuous flop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.