‘मुन्ना मायकल’साठी पापा जॅकी श्रॉफने टायगरला दिली ही खास वस्तू!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2017 06:45 AM2017-06-06T06:45:48+5:302017-06-06T15:52:39+5:30
टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितला असेलच. या चित्रपटात टायगर एका स्ट्रिट बॉयच्या लूकमध्ये दिसणार ...
ट यगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितला असेलच. या चित्रपटात टायगर एका स्ट्रिट बॉयच्या लूकमध्ये दिसणार आहे, हे ट्रेलर पाहून तुम्हाला कळले असेलच. पण या स्ट्रिट लूकसाठी टायगरला कुणी मदत केली माहितीयं. पापा जॅकी श्रॉफ याची. होय, पापा जॅकी श्रॉफ याची.
आता कशी तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ट्रेलर पाहिला असेल तर एक गोष्ट तुम्ही नक्की नोट केली असेल. होय, यातील अनेक सीन्समध्ये टायगरच्या डोक्यावर एक रंगीत रूमाल बांधलेला दिसतोय. हा रंगीत रूमाल स्वत: जॅकीनेच टायगरला दिलेला आहे. मुलगा जी भूमिका साकारतो आहे, ती अगदी जिवंत वाटावी, असे जॅकीला वाटले. त्यामुळेच त्यानेच टायगरला ही कल्पना सुचवली. जॅकी श्रॉफ आपल्या काळातील स्टाईलिश अभिनेता होता. आजही त्याच्या स्टाईलसमोर चांगले चांगले यंग अॅक्टर्स फिके पडतील. जॅकीकडे अशा अनेक रंगीत रूमालांचे व अनेक स्टाईलिश वस्तंूचे कलेक्शन आहे. आपल्या याच कलेक्शनमधील एक रूमाल त्याने टायगरला दिला.
पापाकडून मिळालेल्या या खास भेटीनंतर टायगर एकदम हुरळून गेला. त्याने याबद्दल सांगितले की, मी डोक्यावर रंगीत रूमाल बांधावा, ही साबिर सरांची कल्पना होती. कारण या चित्रपटात मी एक रस्त्यांवर मोठा झालेला एक टपोरी मुलगा साकारला आहे. हा फिल जशाच्या तसा यावा, म्हणून मी डोक्याला रूमाल बांधला. आम्ही या लूकवर काम करत असातानाच पापांनी मला त्यांच्या कलेक्शनमधील हा खास रूमाल दिला. माझ्या भूमिकेला अगदी तो शंभर टक्के शोभून दिसला.