Mayoori Kango : ‘घर से निकलते ही’ या गाण्यातील अभिनेत्री आठवते? आता ओळखणंही झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 04:37 PM2022-06-30T16:37:44+5:302022-06-30T16:39:38+5:30
Mayoori Kango : ‘घर से निकलते ही’ हे गाणं आठवलं की एका अभिनेत्रीचा चेहरा लगेच डोळ्यांसमोर येतो. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री मयुरी कांगो हिच्याबद्दल. आता ती कशी दिसते?
‘घर से निकलते ही’ हे गाणं आठवलं की निळ्या डोळ्यांच्या एका अभिनेत्रीचा चेहरा लगेच डोळ्यांसमोर येतो. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री मयुरी कांगो (Mayoori Kango) हिच्याबद्दल. 1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘पापा कहते है’ या चित्रपटात मयुरी कांगो व जुगल हंसराज हे दोघे लीड रोलमध्ये होते. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत ‘पहले प्यार का पहला गम...’ हे गाणं चांगलंच गाजलं होतं. या चित्रपटानंतर मयुरी कांगो नसीब, बेताबी, होगी प्यार की जीत अशा अनेक चित्रपटांत झळकली आणि एकदिवस अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. आता ती कशी दिसते तर पहिल्या नजरेत तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही.
एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमानंतर मयुरीने बॉलिवूडला रामराम ठोकला. ‘कुर्बान’ हा तिचा अखेरचा सिनेमा. यानंतर तिला सिनेमे मिळेनासे झाले. यामुळे मयुरीने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. कहीं किसी रोज, डॉलर बहू, किटी पार्टी, कुसूम, करिश्मा अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली. पण इथेही तिच्या वाट्याला फारसं यश आलं नाही. 2004 मध्ये तिने ग्लॅमर इंडस्ट्रीला कायमचं अलविदा म्हटलं.
2003 मध्ये मयुरीने एनआयआर आदित्य ढिल्लनसोबत लग्न केलं आणि ती न्यूयॉर्कला शिफ्ट झाली. 2011 मध्ये तिला एक मुलगी झाली. मयुरीने अमेरिकेतील एका बिझनेस स्कूलमधून एमबीए केलं आणि 2019 पासून ती गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड म्हणून काम करतेय. यापूर्वी ती परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर होती.
मयुरीने एकूण 16 चित्रपट केले. पण दुर्दैव म्हणजे, त्यातले अध्यार्हून अधिक प्रदर्शित झालेच नाही. यानंतर तिने पटकथा लिखाण आणि डॉक्युमेंटरीवर लक्ष केंद्रित केलं. 2000 मध्ये ती टीव्हीकडे वळली आणि काही वर्षानंतर लग्न करून यूएसला शिफ्ट झाली.