'अॅनिमल' सिनेमातील 'पापा मेरी जान' गाणं रिलीज, रणबीर कपूर आणि अनिल कपूरचं बॉन्ड करेल इमोशनल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 15:10 IST2023-11-14T15:09:25+5:302023-11-14T15:10:09+5:30
Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'अॅनिमल' चित्रपटातील 'पापा मेरी जान' हे गाणे रिलीज झाले आहे. २ मिनिटे ५७ सेकंदाच्या या चित्रपटात मुलाचे वडिलांसोबतचे बॉन्डिंग दाखवण्यात आले आहे.

'अॅनिमल' सिनेमातील 'पापा मेरी जान' गाणं रिलीज, रणबीर कपूर आणि अनिल कपूरचं बॉन्ड करेल इमोशनल
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या बहुप्रतिक्षित 'अॅनिमल' (Animal Movie) चित्रपटातील 'पापा मेरी जान' हे गाणे रिलीज झाले आहे. २ मिनिटे ५७ सेकंदाच्या या चित्रपटात रणबीरचे वडिलांसोबतचे बॉन्डिंग दाखवण्यात आले आहे. मात्र, अनिल कपूर हे कामात इतके व्यस्त आहेत की त्यांच्याकडे आपल्या मुलासाठी वेळ नसल्याचेही दिसून आले आहे. या गाण्यात रणबीर कपूरच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. हे भावनिक गाणे लोकांच्या मनाला भिडणारे आहे.
सोनू निगमने 'पापा मेरी जान' या गाण्याला आवाज दिला आहे. हे गाणे हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही रिलीज झाले आहे. याआधी रिलीज झालेल्या 'हुआ मैं' आणि 'सतरंगा' या दोन्ही गाण्यांनीही लोकांना प्रभावित केले आहे. या दोन्ही गाण्यांमध्ये रणबीर आणि रश्मिका मंदाना यांची दमदार केमिस्ट्री दिसून आली आहे. रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर हे गाणे रिलीज झाल्याची माहिती दिली. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे.
'अॅनिमल' १ डिसेंबरला येणार भेटीला
अनिल कपूरनेही 'अॅनिमल'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली असून बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोघांची दमदार केमिस्ट्री दिसत आहे. यासोबतच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.