सीता मॅम! पापाराझींची आलिया भटला हाक, अभिनेत्रीची क्यूट रिअ‍ॅक्शन; नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 02:55 PM2023-06-15T14:55:48+5:302023-06-15T14:57:50+5:30

नुकतंच आलिया भटला काही पापाराझींनी 'सीता मॅम' अशी हाक मारली.

paparazi called alia bhat sita mam actress gave cute reaction netizens slammed photographers | सीता मॅम! पापाराझींची आलिया भटला हाक, अभिनेत्रीची क्यूट रिअ‍ॅक्शन; नेटकरी भडकले

सीता मॅम! पापाराझींची आलिया भटला हाक, अभिनेत्रीची क्यूट रिअ‍ॅक्शन; नेटकरी भडकले

googlenewsNext

रामायणावर आधारित 'आदिपुरुष' Adipurush) सिनेमाची जोरदार चर्चा आहे. प्रभास (Prabhas) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) स्टारर या सिनेमाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. तर दुसरीकडे नितेश तिवारी (Nitesh Tiwari) देखील मोठ्या पडद्यावर 'रामायण' आणण्याच्या तयारित आहेत. यामध्ये रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सीतेच्या भूमिकेत आलिया भटचं (Alia Bhat) नाव निश्चित झाल्याचं कळतंय. नुकतंच आलिया भटला काही पापाराझींनी 'सीता मॅम' अशी हाक मारली. यावर आलिया भटने दिलेली रिअॅक्शन व्हायरल होतेय.

काल रात्री आलिया भट मुंबई विमानतळावर आली होती. याावेळी ती कारमधून उतरताच तिला पापाराझींनी घेराव घातला. त्यातल्या एका फोटोग्राफरने तिला 'सीता मॅम' अशी हाक मारली. यावर आलियाने खूपच क्यूट रिअॅक्शन दिली.  ती हाक ऐकताच आलिया लाजली आणि तिने चेहऱ्यावर हसत हसतच हात ठेवला. आणि अरे काय? अशा प्रकारची तिची रिअॅक्शन बघायला मिळाली.

पापाराझींनी अशा प्रकारे सीता मॅम म्हटल्याने नेटकऱ्यांनी मात्र चांगलेच खडेबोल सुनावले. 'सीता माता आहे ती मॅम काय म्हणतो' अशी कमेंट एकाने केली आहे. तसंच आलिया कोणत्या अँगलने सीता माता दिसतेय असाही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला. मात्र रणबीर आलियाचे चाहते त्यांना राम सीतेच्या भूमिकेत बघायला उत्सुक आहेत. 

'रामायण'मध्ये रावणाच्या भूमिकेसाठी आधी साऊथ सुपरस्टार यशची निवड करण्यात आली. मात्र यशने ही ऑफर नाकारल्याचं कळतंय. त्यामुळे आता रामायणची कास्ट नक्की काय असणार यावर शिक्कामोर्तब झालेला नाही.

Web Title: paparazi called alia bhat sita mam actress gave cute reaction netizens slammed photographers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.