सुशांतची आत्महत्या नव्हे हत्या... ? पॅरानॉर्मल एक्स्पर्टने केला सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 03:34 PM2020-07-08T15:34:07+5:302020-07-08T15:35:13+5:30

सुशांतची हत्या करणारा एक पुरूष होता आणि हत्या करताना त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता??

paranormal experts says in the case of sushant that its a murder not suicide | सुशांतची आत्महत्या नव्हे हत्या... ? पॅरानॉर्मल एक्स्पर्टने केला सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा!!

सुशांतची आत्महत्या नव्हे हत्या... ? पॅरानॉर्मल एक्स्पर्टने केला सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा!!

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांत गेल्या 14 जूनला त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केल्याचे मानले जात असले तरी अद्यापही पोलिस ठोस अशा कुठल्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत. अशात सुशांतचे चाहते त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेत आहेत. यापैकीच एक म्हणजे पॅरानॉर्मल रिसर्च.

सुशांतच्या मृत्यूसंदर्भात एका पॅरानॉर्मल रिसर्चचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा केला जातोय. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात कॉस्मो पॅरानॉर्मल अ‍ॅण्ड घोस्ट हंटिंग सोसायटी ऑफ  इंडिया-युके-युएसएच्या एका व्यक्तिने प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्ट शॉन लार्सन व ट्रासा लार्सनसोबत चर्चा केली. त्याचाच  हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत केला जातोय हा दावा
आम्ही सुशांतच्या आत्म्यासोबत बोललो. यावेळी सुशांतने स्वत: त्याची हत्या झाल्याचे सांगितल्याचा दावा या व्हिडीओतील एक्स्पर्ट करत आहेत. एक्स्पर्ट म्हणतात, सुशांतला कोणी मारले, हे सध्या आम्ही सांगू शकत नाही. पण सुशांतची हत्या करणारा एक पुरूष होता आणि हत्या करताना त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता, एवढे मात्र आम्ही सांगू शकतो. आम्ही लवकरच सत्य आणून काढून सुशांत व त्याच्या चाहत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.  आता या दाव्यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत, हेच यातून दिसतेय.
सुशांत गेल्या 14 जूनला त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 28 लोकांची चौकशी केली आहे. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेत्री संजना सांघी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आदींचा समावेश आहे.

Web Title: paranormal experts says in the case of sushant that its a murder not suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.