कॅनडियन नागरिकत्त्व असले तरी 'दिल है हिंदुस्तानी', अक्षयवर टीका करणा-यांवर परेश रावलने दिले उत्तर, तर सलमानला केला सॅल्युट !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 11:03 AM2020-04-01T11:03:00+5:302020-04-01T11:04:27+5:30
अक्षय कुमारसह मला काम करायला मिळाले या गोष्टीचा आज मला खूप अभिमान वाटतो. तो ख-या अर्थाने हिरो ठरला आहे.
कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे आणि येथे मृत्यूची संख्या दररोज वाढत आहे. देशात आतापर्यंत 1397 लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. तर ३५ लोकांनी कोरोनामुळे जीवही गमावला आहे. देश सध्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना मदत करण्यासाठी आवाहन करताच अनेकांनी पुढे येत मदत केली आहे. दिवसेंदिवस मदतीचा ओघ वाढत आहे. फक्त कलाकारच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी मदत करत खारीचा वाटा उचलला आहे. संकटाशी सामना करण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारने तर २५ कोटी देत मदत केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच अक्षय कुमारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेहमीच अक्षयला त्याच्या नागरिकत्त्वामुळे ट्रोल केले जाते. त्याच्यावर टीका केल्या जातात. अक्षयकडे भारतीय नागरिकत्व नसून कॅनडियन नागरिकत्त्व आहे.
Khiladi who plays straight from the Heart ... proud to have known and work with you @akshaykumar 👏👏👏
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 29, 2020
त्यामुळे या एकच गोष्टींवर लोक सतत त्याच्यावर बोलत असतात. मात्र अक्षयने कधीच या गोष्टीचा विचार केला नाही. नागरिकत्व भारतीय नसले तरी दिल है हिंदुस्तानी म्हणत तो नेहमीच मदतीसाठी सर्वात आधी धावून येतो. अशा शब्दांत अभिनेते परेश रावल यांनी अक्षय कुमारचे कौतुक केले आहे. अक्षयने आजपर्यंत कोणतीच गोष्ट लालच म्हणून केली नाही. तो नेहमी आपल्या कामाप्रती इमानदार राहिला आहे. अनेकदा लोकांनी तो त्याच्या स्वार्थ साधत असल्याचे त्याच्यावर टीका करतात. मात्र अक्षयने आजपर्यंत कधीच त्याच्यासाठी काम केले नाही नेहमीच तो इतरांचा आधी विचार करतो असा सज्जन अक्षय आहे. अक्षय कुमारसह मला काम करायला मिळाले या गोष्टीचा आज मला खूप अभिमान वाटतो. तो ख-या अर्थाने हिरो ठरला आहे.
With no ulterior motives or desire for a political career, or setting sight for Ambassadorship or favours from the Gov; here is this gentleman citizen who pays his taxes honestly & does charity passionately. Yet some low lives call @akshaykumar a Canadian citizen !
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 29, 2020
अक्षय पाठोपाठ बॉलिवूडचा दबंग सलमान खानने देखी मोठी रक्कम देत मदत केली आहे. बीईंग फॉऊंडेश या त्याच्या संस्थेअंतर्गत तो जवळपास २५ हजार कर्मचा-यांना आर्थिक मदत करणार आहे. अक्षय कुमारसह सलमानचे देखील परेश रावलच्या कामाला सेल्युट केले आहे.
I doff my hat to @BeingSalmanKhan for such a lion hearted gesture .
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 31, 2020
सध्या परिस्थिती चिंतेची असली तरी या संकटातून बाहेर पडण्यासाठी सा-यांनीच पुढाकार घेण्याचे गरजेचे आहे. त्यामुळे जसे जमेल तसे बेघर लोक, डॉक्टर, भुकेलेली मुले आणि संगीत आणि एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील गरजू लोकांना मदत करण्साठी आवाहन केले आहे. आपले योगदान देण्यास तुम्हाला प्रोत्साहित करू. कुठलीही रक्कम लहान नसते मग तो एक डॉलर का असेना असे म्हणत तिने इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.