झाली का बोलती बंद...? परेश रावल यांचा पाकी अभिनेता अली जफरला सणसणीत टोला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 02:33 PM2019-02-27T14:33:50+5:302019-02-27T14:36:24+5:30

 ‘आता बोलती बंद झाली का?’ असे ट्विट करत त्यांनी अली जफरला लक्ष्य केले.

paresh rawal takes on ali zafar and questions his silence over india air attack against pakistan | झाली का बोलती बंद...? परेश रावल यांचा पाकी अभिनेता अली जफरला सणसणीत टोला!

झाली का बोलती बंद...? परेश रावल यांचा पाकी अभिनेता अली जफरला सणसणीत टोला!

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान चवताळला आहे. याच भावनेतून पाकिस्तानने भारताच्या चित्रपटांवर बंदी घातली आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभर जल्लोषाचे वातावरण आहे. पुलवामा येथील पाकिस्तानने घडवून आणलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या  १२व्या दिवशी भारतीय हवाई दलाने  पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करत, ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.भारतीय हवाई दलाच्या या दमदार कारवाईचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले. या स्वागत करणाºयांमध्ये भाजपाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांचेही नाव होते. ही ख-या अर्थाने चांगली सकाळ होती, अशा शब्दात परेश रावल यांनी आनंद व्यक्त केला. यानंतर परेश रावल यांनी थेट पाकिस्तानी कलाकारांच्या मर्मावर घाव घातला. पाकिस्तानी अभिनेता अली जफरला त्यांनी जोरदार टोला लगावला.  ‘आता बोलती बंद झाली का?’ असे ट्विट करत त्यांनी अली जफरला लक्ष्य केले.




याच अली जफरने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाची स्तूती करणारे ट्विट केले होते. आता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर परेश रावल यांनी अली जफरला त्याच्याच शब्दांत उत्तर दिले. अलीचे ट्विट रिट्विट करत परेश रावल यांनी ‘आता नि:शब्द’ असे ट्विट केले.
भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान चवताळला आहे. याच भावनेतून पाकिस्तानने भारताच्या चित्रपटांवर बंदी घातली आहे.. भारताचा कुठलाही चित्रपट आता पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी केली आहे.

Web Title: paresh rawal takes on ali zafar and questions his silence over india air attack against pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.