'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:17 IST2025-02-12T13:16:42+5:302025-02-12T13:17:46+5:30

 दीपिका पादुकोणने विद्यार्थ्यांसोबत तिच्या शालेय जीवनातील गंमतीजमती शेअर केल्या.

Pariksha Pe Charcha 2025 Deepika Padukone Talked About Mental Health Pm Modi Praised Her | 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या

Pariksha Pe Charcha 2025: सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झालेली पाहायला मिळते आहे. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील नर्सरीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रोत्साहित केलं. विशेष म्हणजे यंदा 'परीक्षा पे चर्चा २०२५' कार्यक्रमाअंतर्गत अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे जीवन अनुभव आणि टिप्स विद्यार्थ्यांसोबत शेअर केले आहेत. याचे  एपिसोड प्रदर्शित करण्यात येत आहेत. नुकतंच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिचा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. तिनं तिच्या शालेय जीवनातील गंमतीजमती विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या. तसेच मानसिक आरोग्यावरवरही मुलांना कानमंत्र दिला. दीपिकाने मुलांच्या मनातील परीक्षेविषयीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. दीपिका बालपणीचा एक मजेदार किस्सा सांगताना म्हणाली, "मी शाळेत खूप खोडकर होते. मी टेबल, खुर्च्यांवर आणि सोफ्यावर उड्या मारायचे".

दीपिकाने परीक्षेची तयारी करण्याचा तिचा अनुभव सांगितला, "परीक्षेच्या वेळी मला खूप ताण यायचा.  मी गणितात खूप कमकुवत होते आणि अजूनही आहे". नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या एक्झाम वॉरियर्स पुस्तकाचा उल्लेख करत ती म्हणाली, "आपण आपल्या भावना  दाबण्याऐवजी  नेहमी व्यक्त केल्या पाहिजेत. विचार डायरीत लिहिणे हा एक उत्तम मार्ग आहे". यासोबत तिनं विद्यार्थ्यांना स्व:तासोबतच स्पर्धा करण्याचा सल्ला.  दीपिकाचा हा एपिसोड शिक्षण मंत्रालय, MyGov India आणि PM मोदी यांच्या YouTube चॅनेलवर तसेच दूरदर्शन चॅनेलवर उपलब्ध आहे. 

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'एक्स' (ट्विटर) अकाउंटवर या कार्यक्रमाची एक झलक शेअर केली आहे. तर दीपिकानंही इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ती म्हणाली, 'मला माननीय पंतप्रधानांचे आभार मानायचे आहेत की, त्यांनी आम्हाला वरीयर्स (चिंता करणारे) म्हणून नव्हे तर एक्झाम वॉरियर्स (लढणारे) म्हणून पुढे येण्यासाठी हे व्यासपीठ दिलं. माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमची परीक्षा उत्तम द्याल". 

Web Title: Pariksha Pe Charcha 2025 Deepika Padukone Talked About Mental Health Pm Modi Praised Her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.