ठरलं! 'या' दिवशी परिणीती 'मिसेस चड्डा' होणार, राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 02:17 PM2023-08-20T14:17:23+5:302023-08-20T14:17:59+5:30

परिणीती आणि राघव यांचा १३ मे रोजी दिल्ली येथे साखरपुडा पार पडला होता.

parineeti and raghav chadda going to marry in september in rajasthan | ठरलं! 'या' दिवशी परिणीती 'मिसेस चड्डा' होणार, राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडणार

ठरलं! 'या' दिवशी परिणीती 'मिसेस चड्डा' होणार, राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडणार

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे निलंबित खासदार राघव चड्डा (Raghav Chadda) यांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. पुढील महिन्यात दोघंही लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे. २५ सप्टेंबर ही तारीखही निश्चित झाली आहे. परिणीती आणि राघव यांचा १३ मे रोजी दिल्ली येथे साखरपुडा पार पडला होता. मात्र लग्नाची तारीख समजली नव्हती. आता पुढील महिन्यात परिणीती चोप्रा मिसेस चड्डा होणार आहे.

ईटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, परिणीती आणि राघव यांचा विवाह राजस्थान येथए पार पडणार आहे. परिणीतीची बहीण आणि ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रानेही राजस्थानमध्येच निक जोनससोबत लग्न केले होते. तर आता परिणीतीनेही तेच लोकेशन निवडले आहे. राघव आणि परिणीती एकाच कॉलेजमध्ये होते. मात्र तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. २०२२ मध्ये त्यांची एके ठिकाणी भेट झाली. त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. परिणीती पंजाबमध्ये 'चमकीला' सिनेमाचं शूटिंग करत होती. तर सेटवर तिला भेटायला राघव चड्डा आले. तेव्हापासून त्यांच्यात जवळीक वाढली. 

परिणीती बहिणीप्रमाणेच शाही लग्न करण्याच्या तयारित आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ती लग्नाची तयारी सुरु करेल. त्यांच्या लग्नात राजकीय आणि मनोरंजनविश्वातील अनेक दिग्गज येतील अशी चर्चा आहे. सध्या परिणीती 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये ती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करत आहे. 

Web Title: parineeti and raghav chadda going to marry in september in rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.