परिणीती आणि राघव: दोघांमध्ये कोण सर्वाधिक श्रीमंत? कोण किती कमावतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:25 PM2023-09-23T12:25:40+5:302023-09-23T12:26:32+5:30

संपत्तीच्या बाबतीत परिणीती चोप्रा ही राघव चढ्ढापेक्षा अधिक श्रीमंत आहे. 

Parineeti and Raghav: Who is the richest among the two? | परिणीती आणि राघव: दोघांमध्ये कोण सर्वाधिक श्रीमंत? कोण किती कमावतो?

Parineeti and Raghav

googlenewsNext

सध्या बी टाऊनमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे.   येत्या २४ सप्टेंबर रोजी दोघांचा विवाहसोहळा उदयपूर येथे शाही थाटात पार पडणार आहे. परिणीती चोप्राबॉलिवूडशी संबंधित आहे. तर दुसरीकडे राघव चढ्ढा आम आदमी पार्टीचे खासदार आहेत. दोघांचेही लक्झरिअस आयुष्य आहे. संपत्तीच्या बाबतीत परिणीती ही राघव चढ्ढापेक्षा अधिक श्रीमंत आहे. 


caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, राघव आणि परिणीती यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती चोप्राची एकूण संपत्ती ही तब्बाल ६० कोटी आहे. तर राघव चढ्ढा यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण ५० लाखांची संपत्ती आहे. तर त्यांची जंगम मालमत्ता ३७ लाख रुपये आहे.


 परिणीती दर महिन्याला ४० लाखांहून अधिक कमावते. चित्रपटांव्यतिरिक्त ती जाहिराती आणि प्रमोशनमधूनही कमाई करते. याच कारणामुळे ती आज करोडो रुपयांची मालकीण आहे. याशिवाय ती एका चित्रपटासाठी ५ कोटी रुपये घेते. परिणीतीला लक्झरी कारचीही शौकीन आहे. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. कार कलेक्शनमध्ये ऑडी, क्यू ५, ऑडी ए ६, जॅग्वार एक्सजेएल सारख्या अनेक आलिशान कार आहेत.

राघव चढ्ढा हे राजकारणात लोकप्रिय आणि यशस्वी आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीसोबत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यासोबतच ते चार्टर्ड अकाउंटंटदेखील आहेत. ग्रँट थॉर्नटन, डेलॉइट, श्याम मालपाणी यांच्यासह अनेक बड्या अकाउंटन्सी कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या तपशिलानुसार, त्यांच्याकडे मारुती स्विफ्ट डिझायर कार आणि ५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ९० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. याशिवाय त्यांनी बाँड्स, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये 6 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. 

Web Title: Parineeti and Raghav: Who is the richest among the two?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.