लग्नाआधी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा दिसले एकत्र; क्यूट व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:40 IST2023-09-08T17:38:32+5:302023-09-08T17:40:27+5:30
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.

Parineeti Chopra and Raghav Chadha
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराई सुरु झाली आहे. सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा. हे दोघेजण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीयांना त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची तयारीही सुरू केली आहे. एकीकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.
विमानतळाच्या आवारात एक बसमध्ये हे जोडपं दिसून आलं. यावेळी दोघांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढले. परिणीतीनं पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात सर्वांच लक्ष वेधून घेतलं. ततर राघव चढ्ढा हे कुर्ता पायजमामध्ये दिसले. या दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे. दोघेही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
काही दिवसांपुर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी उजैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट देत महादेवाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी परिणीतीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर राघव चड्ढा यांनी पारंपरिक लूक केला होता. याआधीही राघव व परिणीती अमृतसरमधील सुवर्णमंदिरात एकत्र दिसून आले होते.
परिणीती आणि राघव यांचा १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, २३-२४ सप्टेंबरपासून परिणीती आणि राघव यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात होणार आहे. दयपूरमध्ये हा लग्न सोहळा पार पडेल. तर ३० सप्टेंबरला चंदीगडमधील ताज हॉटेलमध्ये त्यांचं ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडमधीलसेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.