परिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 11:03 IST2018-10-15T10:53:16+5:302018-10-15T11:03:15+5:30
सध्या बी टाऊनमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये फिरताना स्पॉट झाले.

परिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण
सध्या बी टाऊनमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये फिरताना स्पॉट झाले. प्रियांका जोधपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान परिणीती चोप्रा आपल्या बहिणीच्या लग्नात जीजूकडून एक मोठी रक्कम मागणार असल्याची चर्चा आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात परिणीती जीजू निककडून बूट लपवण्याच्या विधीसाठी 5 मिलियन डॉलर म्हणजे तब्बल 37 कोटी डिमांड करणार आहे. निकने यावर परिणीतीला 5 डॉलर (750 रुपये) देण्याचे वचन दिले आहे. मात्र ऐवढ्या कमी पैशात आपण बूट परत करणार नसल्याचे परिणीतीने सांगितले आहे.
परिणीती चोप्रा आपल्या लडक्या बहिणीच्या म्हणजेच प्रियांकाच्या लग्नात 'तूने मारी एंट्री' आणि 'राम चाहे लीला चाहे राम' या गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. निक जोनासासोबत प्रियांकाचा रोका झाला. त्या रोका सेरेमनीमध्ये परिणीती चोप्रा खूपच एक्सायडेट दिसत होती. प्रियांकाच्या मुंबईतील घरी प्रियांका व निकचा ‘रोका’ काही महिन्यांपूर्वी पार पडला. विधिवत पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्याला दोघांच्याही कुटुंबातले काही मोजकेच लोक उपस्थित होते. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष प्रियांकाच्या लग्नाकडे लागले आहे. मात्र दोघांच्या लग्नाची तारीख अजूनसमोर आली नाहीय.