परिणीती चोप्रा इन्वेस्टमेंट मॅनेजर म्हणून करायची काम, मंदीमुळे नोकरी गेली अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 08:00 AM2023-10-22T08:00:00+5:302023-10-22T08:00:01+5:30
परीचा आज खरं तर बॉलिवूडमध्ये येण्याचा कोणत्याच विचार नव्हता.
बॉलिवूड बॉलिवूडची परी अर्थात परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आज (22 ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. लग्नानंतरचा हा परिणीतीचा पहिलाच वाढदिवस आहे त्यामुळे तो खास असणार आहे. आप नेते राघव चड्ढा यांनी आपल्या पत्नीसाठी काही तरी नक्की स्पेशल प्लानिंग केलं आहे. हरियाणाच्या अंबालामध्ये जन्मलेल्या परीचा आज खरं तर बॉलिवूडमध्ये येण्याचा कोणत्याच विचार नव्हता. हिरोईन होण्याचा तर तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. पण कदाचित नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
इव्हेस्टमेंट बँकिंगमध्ये करिअर करण्याचे परिणीतीने आधीपासूनच ठरवून टाकले होते. आपल्या याच ध्यासापोटी तिने मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. येथे परीने बिझनेस, फायनान्स व इकॉनॉमिक्समध्ये आॅनर्स डिग्री घेतली. पण २००९ मध्ये परिणीतीला रिसेशनमुळे भारतात परतावे लागले. भारतात आल्यावर परिणीतीला यशराज बॅनमध्ये पब्लिक रिलेशन कन्सलटन्ट म्हणून नोकरी मिळाली. पण ही नोकरीच परिणीतीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. 2009 मध्ये जेव्हा मंदी आली तेव्हा या मंदीत तिने आपली नोकरी गमावली.
नोकरी गेल्यानंतर परिणीती भारतात परतली. ती एकदा बहीण प्रियंका चोप्रासोबत एका स्टुडिओमध्ये गेली होती आणि इथे तिने काम करायला सुरुवात केली. यशराजमध्ये काम करत असताना हळूहळू चित्रपटांकडे तिचा कल वाढला.नंतर तिने ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.. या चित्रपटात ती रणवीर सिंगच्या अपोझिट दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण या चित्रपटातून परिणीतीचीही बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली.
यानंतर ‘इशकजाद’ हा सोलो चित्रपट परिणीतीला मिळाला. हा परिणीतीचा खऱ्या अर्थाने डेब्यू होता. यात ती लीड अभिनेत्री होती. या चित्रपटानंतर परिणीतीने कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्री असण्यासोबतच परिणीती चांगली गायिका सुद्धा आहे. तिने ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरे मिट्टी में मिल जावा’ आणि मेरी प्यारी बिंदू सिनेमातील ‘मान की हम यार नहीं’ हे गाणं गायलं आहे.