‘लाईफ इन अ मेट्रो’च्या सीक्वलमध्ये परिणीती चोप्राची एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 08:47 PM2018-09-18T20:47:44+5:302018-09-18T20:50:14+5:30

होय, सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर परिणीतीने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘लाईफ इन अ मेट्रो2’.

Parineeti Chopra On Board Of Anurag Basu Film Life In A Metro's sequel | ‘लाईफ इन अ मेट्रो’च्या सीक्वलमध्ये परिणीती चोप्राची एन्ट्री!!

‘लाईफ इन अ मेट्रो’च्या सीक्वलमध्ये परिणीती चोप्राची एन्ट्री!!

googlenewsNext

परिणीती चोप्रा सध्या ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा लीड रोलमध्ये आहे. याशिवाय परिणीतीचा ‘नमस्ते लंडन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता परिणीतीने आणखी एक नवा चित्रपट साईन केल्याची खबर आहे. होय, सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर परिणीतीने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘लाईफ इन अ मेट्रो2’.
‘जग्गा जासूस’ या सिनेमानंतर दिग्दर्शक अनुराग बासू नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. तो म्हणजे, ‘लाइफ इन मेट्रो’ या चित्रपटाचा सिक्वल. या सीक्वलमध्ये परिणीतीची वर्णी लागल्याची खबर आहे. अर्थात अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटात परिणीती राजकुमार रावच्या अपोझिट दिसणार असल्याचे कळतेय. अनुरागने या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू केले आहे. लवकरच चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. या सीक्वलमध्ये अभिषेक बच्चन, सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू व ईशान खट्टर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार अशीही चर्चा आहे.  या सिनेमाला संगीत प्रीतम देणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग बसूला रणबीर कपूरला या चित्रपटात घ्यायचे होते. पण, त्याने मल्टीस्टारर चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
‘लाइफ इन मेट्रो’ चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात शिल्पा शेट्टी, कंगना राणौत, कोंकणा सेन शमाृ, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते.

Web Title: Parineeti Chopra On Board Of Anurag Basu Film Life In A Metro's sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.