Code Name: Tiranga Movie Review :  परिणीती चोप्राचा नेम चुकलेला ‘कोड नेम : तिरंगा’, वाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: October 14, 2022 03:01 PM2022-10-14T15:01:54+5:302022-10-14T15:03:30+5:30

Code Name: Tiranga Movie Review in Marathi : आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिशन्सवर आधारलेले बरेच सिनेमे नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘कोड नेम : तिरंगा’ या चित्रपटात एका लेडी रॉ एजंटची कथा आहे...

Parineeti Chopra film Code Name: Tiranga Movie Review in marathi | Code Name: Tiranga Movie Review :  परिणीती चोप्राचा नेम चुकलेला ‘कोड नेम : तिरंगा’, वाचा रिव्ह्यू

Code Name: Tiranga Movie Review :  परिणीती चोप्राचा नेम चुकलेला ‘कोड नेम : तिरंगा’, वाचा रिव्ह्यू

googlenewsNext

दर्जा: ** (दोन स्टार)
कलाकार :परिणीती चोप्रा (Parineeti Chopra), हार्डी संधू, शरद केळकर, रजीत कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती, 
लेखक-दिग्दर्शक : रिभू दासगुप्ता
निर्माते : भूषण कुमार, कृष्ण कुमार, रिभू दासगुप्ता, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, विवेक अग्रवाल
शैली : अ‍ॅक्शन ड्रामा
कालावधी : 2 तास 17 मिनिटे
.........................

Code Name: Tiranga Movie Review in Marathi : आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिशन्सवर आधारलेले बरेच सिनेमे नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात, ज्यात जीवावर उदार होऊन अतिरेक्यांना पकडण्याचं आव्हान स्वीकारणाऱ्या रॉ एजंट्सच्या साहसकथा दाखवल्या जातात. या चित्रपटात एका लेडी रॉ एजंटची कथा आहे, पण पटकथेपासून सादरीकरणापर्यंत बऱ्याच त्रुटी राहिल्यानं लेखक-दिग्दर्शक रिभू दासगुप्तांचा ‘कोड नेम : तिरंगा’ हा चित्रपट नेम चुकलेला एखादा कोड डिकोड करण्याचा प्रयत्न असल्यासारखं वाटतं.

कथानक : रॉ एजंट दुर्गा सिंगची ही कथा आहे. अफगाणिस्तानमध्ये इस्मत बनून राहणारी दुर्गा डॉ. मिर्झा अलीसोबत निकाह करते. मिर्झाच्या एका जवळच्या मित्राच्या निकाह सोहळ्यात सहभागी होण्याकरता दुर्गासुद्धा सोबत जाते. त्या निकाह सोहळ्यात अतिरेकी खलिद ओमरही येणार असल्यानं तिथे भारतीय सैनिक हल्ला करतात. त्यावेळी दुर्गाचं खरं रूप समोर येतं. दुर्गाचं ते रूप पाहून मिर्झाला खूप मोठा धक्का बसतो, पण नाईलाज असल्यानं तिलाही मिर्झाला सोडून जावं लागतं. दुसरीकडे वरीष्ठ रॉ एजंट बक्षींना संपण्याची जबाबदारीही दुर्गावर सोपवण्यात येते. यादरम्यान काही घटना घडतात आणि पुन्हा दुर्गा व मिर्झाची भेट होते. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात आहे.

लेखन-दिग्दर्शन : आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुप्त कारवाया यशस्वी करणाऱ्या भारतीय महिला रॉ एजंटची कथा चित्रपट रूपात सादर करण्याची संकल्पना चांगली असली तरी पटकथेतील ढिसाळपणानं घात केला आहे. या चित्रपटात इंटरनॅशनल ऑप्स म्हणजे ‘घे सुरी आणि मार उरी’ अशातला प्रकार वाटतो. कोणताही अभ्यास नाही, डिटेलिंग नाही, तयारी नाही, बॅक अप प्लॅन नाही, टिम नाही, वातावरण निर्मिती नसताना अतिरेक्यांच्या किल्ल्यात घुसून त्यांना कंठस्नान घालताना दाखवणारं दिवा स्वप्न वाटावा असा हा चित्रपट आहे. एका ऑपरेशनमध्ये व्हिडिओ गेमसारखा कॅमेरा हाताळला आहे, पण तो डोकं चक्रावून टाकतो. व्हिएफएक्स खूपच बालीश वाटतात. टायटलमध्ये तिरंगा असला तरी चित्रपटांमधील घटनांमध्ये कुठेही जाणवत नाही. शेवटी क्रेडिट लिस्ट मात्र तिरंगी आहे. ‘वंदे मातरम’ हे गाणंच अजरामर असल्यानं ते कोणत्याही चालीत चांगलंच वाटतं. संकलनातही काही त्रुटी जाणवतात.

अभिनय : कलाकारांच्या अभिनयाचा प्रश्नच नाही, पण दिग्दर्शकांनी त्यांच्याकडून आणखी चांगलं काम करवून घेणं अपेक्षित होतं. परिणीतीनं आजवरच्या कारकिर्दीतील आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, पण तिलाही काही मर्यादा आहेत. हार्डी संधूनं आपल्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा चोख बजावली आहे. पुन्हा एकदा दिव्येंदू भट्टाचार्य इम्प्रेस करण्यात यशस्वी झाला आहे. अतिरेक्याच्या व्यक्तिरेखेत शरद केळकरचं क्रूर रूप पहायला मिळत नाही. रजीत कपूर यांनीही चांगली साथ दिली आहे. सब्यसाची चक्रवर्ती यांनी छोटीशी भूमिकाही सहजपणे साकारली आहे.

सकारात्मक बाजू : संकल्पना, कलाकारांचा अभिनय, मेकअप, कॉस्च्युम
नकारात्मक बाजू : दिग्दर्शन, संकलन, कॅमेरावर्क, लॉजिकलेस सीन्स

थोडक्यात : केवळ एका चांगल्या संकल्पनेवर आधारीत असलेला हा चित्रपट पाहण्याची इच्छा असल्यास कलाकारांच्या अभिनयासाठी पहायला हरकत नाही.

Web Title: Parineeti Chopra film Code Name: Tiranga Movie Review in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.