'मिशन राणीगंज'मध्ये परिणीती चोप्राला फक्त 10 मिनिटांचा स्क्रीन टाईम? काय खरं काय खोटं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 17:32 IST2023-10-04T17:30:45+5:302023-10-04T17:32:26+5:30

 'केसरी' नंतर पुन्हा अक्षय आणि परिणीतीची रोमँटिक केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

Parineeti Chopra only 10 minutes of screen time in 'Mission Raniganj' | 'मिशन राणीगंज'मध्ये परिणीती चोप्राला फक्त 10 मिनिटांचा स्क्रीन टाईम? काय खरं काय खोटं!

Parineeti Chopra

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा 'मिशन राणीगंज'  सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटात  'केसरी' नंतर पुन्हा अक्षय आणि परिणीतीची रोमँटिक केमिस्ट्री बघायला मिळत आहे. पण, या चित्रपटात परिणीतीचा फक्त 10 मिनिटांचा स्क्रीन टाईम असल्याची चर्चा सुरू आहे.

चित्रपटात परिणीती चोप्रा अक्षयच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. परिणीतीचा स्क्रीन टाइम मर्यादित असला तरी  मिशन राणीगंजमध्ये तीची भूमिका महत्त्वाची असणार आहे.  नुकतेच 'मिशन राणीगंज' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. गाणं रिलीज होताच काही मिनिटांतच व्हायरल झालं आहे. परिणीतीने यामध्ये साधी साडी नेसली असून केसांचा बन बांधून गजरा लावला आहे. ती खूपच आकर्षक दिसत आहे.

 मिशन राणीगंज: द ग्रेट भारत हा एक थ्रिलर चित्रपट आहे. हा सिनेमा पश्चिम बंगालमधील राणीगंज कोलफिल्ड्सच्या १९८९ मध्ये कोसळलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आयआयटी धनबादमधील मायनिंग इंजीनियर जसवंत सिंह गिलची भूमिका साकारणार आहे, ज्याने आपली शक्कल लढवून ६५ खाण कामगारांचे प्राण वाचवले होते. 

 नुकतेच परिणीती ही APP पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली . या नवविवाहित जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, लग्नानंतर रीलिज होणारा हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. 

Web Title: Parineeti Chopra only 10 minutes of screen time in 'Mission Raniganj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.