परिणिती चोप्रा का गुणगुणतेय ऑस्ट्रेलियाचे सूर?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 11:57 AM2018-01-24T11:57:07+5:302018-01-24T17:27:07+5:30
परिणिती चोप्राने ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड आणि नॉर्दन टेरिटरीमध्ये घालवलेल्या सुट्टीचे अनुभव सांगणारे तिचे व्हिडिओ तिच्या फॅन्ससाठी शेअर केले आहेत. या व्हिडिओला तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ऑ ्ट्रेलिया डेचे लक्षणीय निमित्त साधून बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘फ्रेण्ड ऑफ ऑस्ट्रेलिया’ परिणिती चोप्राने ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड आणि नॉर्दन टेरिटरीमध्ये घालवलेल्या सुट्टीचे अनुभव सांगणारे तिचे व्हिडिओ तिच्या फॅन्ससाठी शेअर केले आहेत. ऑस्ट्रेलियन हॉलिडेजसाठी एक समर्थन अभियान म्हणून हे व्हिडिओ सर्व माध्यमांतून प्रमोट केले जाणार आहेत. या व्हिडिओंमुळे परिणितीच्या चाहत्यांवर प्रभाव पडेल आणि एखाद्या रमणीय स्थळाच्या शोधात असलेल्या संभाव्य पर्यटकांना प्रेरणा मिळेल असे तिचे म्हणणे आहे. या व्हिडिओला तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ऑस्ट्रेलियाचे सनशाइन स्टेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्वीन्सलँडचे दर्शन घडवणाऱ्या या व्हिडिओंना एक पर्सनल टच देण्यासाठी या प्रतिभावान अभिनेत्रीने व्हिडिओत बॅकग्राऊंडला वाजणारे गाणे स्वत: गायले आहे. या गाण्याच्या शब्दांमध्ये तिने भेट दिलेल्या स्थळांचे सार सुंदर पद्धतीने सामावलेले आहे. परिणितीने गायलेले हे बॉलिवूडशी संबंधित नसलेले पहिलेच गाणे आहे. त्यामुळे हे गाणे गाण्यासाठी ती खूपच उत्सुक होती. या व्हिडिओबद्दल परिणिती चोप्रा सांगते, “मी ऑस्ट्रेलियात प्रचंड आनंद लुटला आणि मी तिथे केलेली मौजमजा या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलिया खूपच सुंदर आहे. उलुरूमधील आदिवासी संस्कृतीत बुडून जाण्यापासून ते क्वीन्सलंडमधील मौजमजेत बागडण्यापर्यंत देशाच्या दोन पूर्णपणे भिन्न बाजूंची ओळख करून देणारे समृद्ध अनुभव मला तिथे मिळाले. खरोखरच प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे असे हे स्थळ आहे.”
या व्हिडिओंमधून ऑस्ट्रेलियातील अनुभवांची एक नेत्रसुखद चित्रमालिका उलगडली गेली आहे. यातील दृश्यांमध्ये परिणिती ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या कोआला नावाच्या प्राण्याला कुरवाळताना दिसते, गोल्ड कोस्टवरच्या लाटांवर स्वार होऊन सर्फिंग शिकताना दिसते, ऑस्ट्रेलियातील ताज्या उत्पादनांची लज्जत चाखताना दिसते, स्कायपॉइंट क्लाइम्बवर बर्ड्स आय व्ह्यूची मजा लुटताना दिसते, देवमासे शोधताना दिसते, उलुरुतील रेड सेंटरवरून सूर्यास्त डोळ्यांत साठवताना दिसते आणि ब्रुन्स मन्रोच्या सुंदर मांडण शिल्पाच्या ‘फिल्ड ऑफ लाइट’च्या बाजूला उभी दिसते. या व्हिडिओत परिणिताचा एक वेगळा अंदाज अनुभवायला मिळत आहे.
Also Read : प्रियंका आणि परिणिती चोपडाप्रमाणेच स्टायलिश आहे त्यांची चुलत बहीण, पहा फोटो!