परिणीती चोप्राला राजमौलींच्या चित्रपटाची लॉटरी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 03:24 PM2019-01-27T15:24:11+5:302019-01-27T15:24:33+5:30
‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’नंतर यावर्षांत राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत. पण या चित्रपटाची हिरोईन कोण असणार, हे मात्र गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय.
ठळक मुद्देपरिणीतीला याआधीही साऊथचा एक सिनेमा ऑफर झाला होता. ही ऑफर तिने स्वीकारली असती तर ती महेशबाबूच्या अपोझिट ‘स्पाईडर’मध्ये दिसली असती.
दिग्दर्शक एस. एस. राजमौली साऊथ इंडस्ट्रीतील एक बडे नाव आहे. ‘बाहुबली’ सीरिजनंतर तर राजमौलींची ख्याती जगभर पसरली. ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली. ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’नंतर यावर्षांत राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत. पण या चित्रपटाची हिरोईन कोण असणार, हे मात्र गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. ताजी चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची वर्णी लागली आहे.
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) January 26, 2019
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आरआरआर’साठी परिणीतीसोबत मेकर्सची चर्चा सुरु आहे. शूटींग लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मेकर्सची इच्छा आहे. ही आॅफर आली तेव्हा परिणीतीने यासाठी भरभक्कम फी मागितली. विशेष म्हणजे, याऊपरही मेकर्स राजी झालेत. परिणीतीने मागितलेल्या अमाऊंटवर तिला साईन करण्याची तयारी त्यांनी दाखवली. या चित्रपटात परिणीतीची नेमकी भूमिका काय असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ज्युनिअर एनटीआर व राम चरण यापैकी कुण्या एकाशी ती आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल्न, असे कळतेय. लवकरच याबाबतची घोषणा होणे अपेक्षित आहे.
बहनें 👯♀ @priyankachoprapic.twitter.com/nugDpfxKsM
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) January 18, 2019
परिणीतीला याआधीही साऊथचा एक सिनेमा ऑफर झाला होता. ही ऑफर तिने स्वीकारली असती तर ती महेशबाबूच्या अपोझिट ‘स्पाईडर’मध्ये दिसली असती. पण त्यावेळी तिने ती ऑफर धुडकावून लावली आणि तिच्या जागी रकुल प्रीतची वर्णी लागली. यावेळी मात्र राजमौलीसारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी परिणीतीने सोडली नाही. स्वत:च्या अटींवर का असेला तिने हा चित्रपट स्वीकारला.