लस घेतल्यानंतर अशी झाली परिणीती चोप्राची अवस्था, प्रियंकानं क्लिक केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:12 AM2021-07-15T11:12:29+5:302021-07-15T11:13:25+5:30
परिणीतीने लंडनमध्ये फाइजर या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरणानंतरचे काही फोटोही तिने शेअर केलेत.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या लंडनमध्ये आहे आणि चाहत्यांना सलग अपडेट देतेय. परिणीतीने लंडनमध्ये फाइजर या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरणानंतरचे काही फोटोही शेअर केलेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये परी वेगवेगळ्या मूडमध्ये दिसतेय.
इन्स्टाग्रामवर लसीकरणानंतरचे तीन फोटो तिने शेअर केले आहेत. ‘मी लस घेतली आणि काही फोटो घेतले. मला खूप त्रास होतोय,’ अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. सोबत प्रियंका चोप्राने हे फोटो घेतल्याचेही तिने आवर्जुन सांगितले आहे.
लस घेतल्यानंतर परिणीती चांगलीच खूश होती. पण नंतर हात दुखू लागल्यानंतर तिचा मूड बदलला. काऊचवरचा तिचा हा फोटो याचा पुरावा आहे. परिणीतीच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर यावर्षी तिचे तीन सिनेमे रिलीज झालेत. संदीप और पिंकी फरार, द गर्ल आॅन द ट्रेन आणि सायना. सायना या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. हा सिनेमा बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला होता. परिणीतीने यात सायनाची भूमिका साकारली होती.
आपल्या अभिनयाने परिणीती चोप्राने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर दिग्गज अभिनेत्यांसह परिणीतीची केमिस्ट्री चांगलीच जुळली. आता परिणीती अधिक सिलेक्टीव्ह झाली आहे. केवळ आॅफर्स मिळतायेत म्हणून सिनेमा स्विकारणार नसल्याचे तिने म्हटले आहे. कोरोनामुळे जसे आयुष्य बदलले तसेच अनेक गोष्टी आता यानंतरही बदलणार आहेत. परिणीतीने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र चित्रपटांची निवड करताना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते.