Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? परीच्या हातातील अंगठीने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 15:26 IST2023-04-18T15:24:47+5:302023-04-18T15:26:36+5:30
Parineeti Chopra : परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत आहे.

Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? परीच्या हातातील अंगठीने वेधलं लक्ष
बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. होय, चर्चा जोरात आहे. परिणीती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत नात्यात असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर दोघंही लग्न करणार असल्याचंही कानावर येतंय. अद्याप परिणीती वा राघव चड्ढा यावर काहीही बोललेले नाहीत. पण अशात परिणीतीच्या हातातील अंगठीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत आहे. तिच्या हातातील अंगठी पाहून परिणीतीने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं मानलं जात आहे.
परिणीती सोमवारी रात्री सेलिब्रिटी मॅनेजर पूनम दमानिया यांच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाली होती. यादरम्यान परिणीतीने जीन्स आणि क्रॉप टॉप घातला होता. परिणीती कॅज्युअल लूकमध्ये खूपच आकर्षक दिसत होती. ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्माईल दिली. सोबत बोटातील अंगठीही ती फ्लॉन्ट करताना दिसली.
परिणीती व राघव चड्ढा अद्याप तरी रिलेशनशिपच्या चर्चांवर काहीही बोललेले नाहीत. पण अनेकांनी या नात्यावर शिक्कामोर्तब मात्र केलंय. काही दिवसांआधीच आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत परिणीत व राघव चड्ढा दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूनेही (Harrdy Sandhu) दोघांना शुभेच्छा देत, दोघांचं नातं कन्फर्म केलं होतं. डीएनएला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हार्डीने परिणीती लग्न करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं होतं. अखेर परिणीती आपल्या आयुष्यात सेटल होतेय... हे घडतंय, याचा मला प्रचंड आनंद आहे. मी तिला शुभेच्छा देतो, असं हार्डी संधू म्हणाला होता.
परिणीती चोप्रा पहिल्यांदा मुंबईत राघव चड्ढांसोबत स्पॉट झाली होती. दोघेही एकत्र डिनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत.