'कांतारा' ते 'डॉक्टर जी' नाही, तर हा फ्लॉप चित्रपट नेटफ्लिक्सच्या ट्रेडिंगमध्ये आहे अव्वल स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 06:59 PM2022-12-21T18:59:48+5:302022-12-21T19:07:26+5:30
नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग हिंदी चित्रपटाच्या बाबतीत यापैकी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली हे जाणून घेऊया.
Code Name Tiranga On Netflix: सध्या थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, लोक OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडे प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वर अनेक मोठे चित्रपट ऑनलाइन स्ट्रीम केले गेले आहेत. यामध्ये साऊथ सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा 'कांतारा', अभिनेत्री परिणीती चोप्राचा 'कोड नेम तिरंगा' आणि बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'डॉक्टर जी' या चित्रपटांचाही समावेश आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग हिंदी चित्रपटाच्या बाबतीत यापैकी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली हे जाणून घेऊया.
नेहमीप्रमाणेच यावेळीही नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग हिंदी चित्रपटांची यादी तयार करण्यात आली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा साऊथचा सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' यात एक नंबरवर असेल, अशी अपेक्षा होती, पण सुरुवातीच्या टप्प्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या 'कोड नेम तिरंगा'ने कांतारा मागे टाकले आहे. एवढेच नाही तर अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'डॉक्टर जी' देखील नंबर 2 वर आहे.
'कांतारा' तिसऱ्या नंबरवर आहे. परिणीती चोप्राचा 'कोड नेम तिरंगा', जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, तो नेटफ्लिक्सवर धूमाकूळ घालतो आणि नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे.