सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये कोल्डवॉर, समोर आले हे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 10:41 AM2019-04-04T10:41:23+5:302019-04-04T10:42:13+5:30
बी-टाऊनमध्ये दोन अभिनेत्रींमधली कॅट फाईट काही नवीन नाही. सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे.
ठळक मुद्देसोनाक्षी आणि परिणीती अजय देवगणच्या 'भूज- द प्राईड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहेत.दोन्ही अभिनेत्री सेटवर एकमेकांशी न बोलणेच पसंत करतात
बी-टाऊनमध्ये दोन अभिनेत्रींमधली कॅट फाईट काही नवीन नाही. सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे. याच्या मागचे कारण आहे त्यांचा आगामी सिनेमा. सोनाक्षी आणि परिणीती अजय देवगणच्या 'भूज- द प्राईड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार दोन्ही अभिनेत्री सेटवर एकमेकांशी न बोलणेच पसंत करतात. सोनाक्षी सिन्हा सगळ्यांना 'भूज- द प्राईड ऑफ इंडिया'मध्ये ती मुख्य साकारत असल्याचे सांगतेय. नेमकी हीच बाब परिणीतीला खटकली आणि तिने सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमकडे याबाबत तक्रार केली आहे. परिणीतीच्या म्हणण्यानुसार दोघांची सिनेमात बरोबरीची भूमिका असताना सोनाक्षीचे सिनेमात ती मुख्य भूमिका साकारत आहे असे सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे आता सोनाक्षी आणि परिणीतीने सेटवर एकमेकींशी बोलणं बंद केले आहे.
‘भूज- द प्राईड ऑ इंडिया’ सिनेमाबाबत बोलायचे झाले तर १९७१ च्या भारत-पाक युद्धदरम्यान भूज विमान तळाचे प्रभारी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. अजय देवगण यात विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. अभिषेक दुधई द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट गिन्नी खानूजा,वजीर सिंह, भूषण कुमार यांची निर्मिती आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान विजय कर्णिक भूज विमानतळावर तैनात होते. पाकी हवाई हल्ल्यात भूज तळावरची धावपट्टी ध्वस्त झाली होती. ही धावपट्टी पुन्हा उभारणे गरजेचे होते. अशावेळी विजय कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत, बाजूच्या गावातील महिलांच्या मदतीने ही धावपट्टी उभारली होती. भारत-पाक युद्धात या धावपट्टीचे योगदान महत्त्वाचे राहिले आणि पर्यायाने ही धावपट्टी नव्याने उभारणारे विजय कर्णिक यांचे योगदानही अनन्यसाधारण ठरले.