Parineeti Chopra: आम आदमी पार्टीच्या नेत्याला डेट करतेय परिणीती चोप्रा? फोटो समोर येताच चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:12 PM2023-03-23T14:12:53+5:302023-03-23T14:14:51+5:30
Parineeti Chopra : होय, परिणीती आम आदमी पार्टीच्या एका नेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांचे फोटो व्हायरल झालेत आणि लगेच दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली.
बॉलिवूड स्टार्सच्या अफेअरच्या चर्चा फार काळ लपत नाहीत. आता अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अफेअरच्या (Parineeti Chopra ) चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. होय, परिणीती आम आदमी पार्टीच्या एका नेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांचे फोटो व्हायरल झालेत आणि लगेच दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली. आता या नेत्याचं नाव जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. तर त्यांचं नाव राघव चड्ढा.
राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आहेत आणि पंजाबचे राज्यसभा खासदार आहेत. काल मुंबईत परिणीत राघव यांच्यासोबत दिसली. एका रेस्टॉरंटबाहेर दोघांनाही स्पॉट केलं गेलं. मस्ती मूडमधील त्यांचे रेस्टॉरंटबाहेरचे फोटो व्हायरल होताच, परिणीती व राघव यांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्यात. अद्याप परिणीती व राघव यावर काहीही बोललेले नाहीत. त्यामुळे तूर्तास सगळ्या चर्चा आहेत. खरं काय, ते लवकरच कळेलच.
यावर्षाच्या जानेवारी महिन्यात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' या सन्मानाने एकत्रितपणे सन्मानित करण्यात आलं होतं. भारतात पहिल्यांदाच एखाद्याला हा सन्मान मिळाला होता.
परिणीतीला इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये तिचे करिअर करायचं होतं. बॅंकर बनण्याचं तिचं स्वप्नं होतं. पंरतु, 2009 मध्ये आलेल्या जागतिक मंदीमुळे तिची नोकरी गेली. अनेक पदव्या असूनही तिला लंडनमध्ये मनासारखा जॉब मिळाला नव्हता. अखेर तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबईत परिणीतीने यशराज फिल्म्सच्या मार्केटिंग आणि पीआरच्या डिपार्टमेंटमध्ये इंटर्नशीप सुरू केली. या इंटर्नशीपच्या दरम्यानच परिणीतीला पहिल्यांदा अभिनय आणि फिल्ममेकिंगसंदर्भात शिकायला मिळालं. एकदिवस यशराजच्या ऑफिसमध्ये दिग्दर्शक मनीष शर्मा यांची परिणीतीवर नजर पडली. तिच्यातील कलाकार त्यांनी ओळखला आणि तिच्यामध्ये कलाकाराचे गुण त्यांना दिसले असावे. त्यामुळे त्यांनी तिला 2011 मध्ये आलेल्या ‘लेडीज वर्सेज रिक्की बहल’ या सिनेमासाठी कास्ट केलं. या चित्रपटात परिणीतीला सहाय्यक अभिनेत्री म्हणून संधी मिळाली. यानंतर ‘इशकजाद’ हा सोलो चित्रपट परिणीतीला मिळाला. हा परिणीतीचा खऱ्या अर्थाने डेब्यू होता. यात ती लीड अभिनेत्री होती. या चित्रपटानंतर परिणीतीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.