सायना नेहवालच्या बायोपिकचा फर्स्ट लूक आऊट, या तारखेपासून परिणीती सुरु करणार शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:01 PM2019-10-07T17:01:32+5:302019-10-07T17:05:16+5:30

'परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Parineeti will start shooting for saina nehwal biopic of from october 11 first look revealed | सायना नेहवालच्या बायोपिकचा फर्स्ट लूक आऊट, या तारखेपासून परिणीती सुरु करणार शूटिंग

सायना नेहवालच्या बायोपिकचा फर्स्ट लूक आऊट, या तारखेपासून परिणीती सुरु करणार शूटिंग

googlenewsNext

'परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तिने द गर्ल ऑन ट्रेन सिनेमाची शूटिंग पूर्ण केली. आता परिणीती सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीला लागली आहे. अमोल गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. सायनाची भूमिका साकारण्यासाठी परिणीती  बॅटमिंटन कोर्टवर अनेक तास घाम गाळते आहे. सिनेमाची शूटिंग 11 ऑक्टोबरला सुरु होणार आहे.   परिणीतीचा बॅटमिंटनचे प्रशिक्षण घेत असल्याचे एक फोटो याआधी समोर आले होते. 


एका मुलाखतीत दरम्यान परिणीतीने सांगितले की, ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात. अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर ते त्या खेळात प्राविण्य मिळवतात किंवा यश संपादन करतात. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी मी माझ्या परिने पूर्णपणे प्रयत्न करेन. बॅडमिंटन हा एक कठीण खेळ आहे. त्यासाठी कठोर परिश्रमही तितकेच गरजेचे आहेत.त्यामुळे सध्या बॅटमिंटनसह इतर गोष्टींवर परिणीती मेहनत घेत आहे. तसेच या वर्षी सिनेमाची शूटिंगही संपवून 2020 मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्माते भूषण कुमार यांनी ठरवले आहे.




परिणीतीचा सायनाच्या लूकमधला फोटोदेखील समोर आला आहे. सायना नेहवालने परिणीतीचा फोटो शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.  

Web Title: Parineeti will start shooting for saina nehwal biopic of from october 11 first look revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.