"लहान बाळं, वृद्धांसह प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय"; मुंबई एअरपोर्टच्या ढिसाळ कारभारावर राधिकाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:13 PM2024-01-13T12:13:01+5:302024-01-13T12:14:01+5:30

Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. तिने पोस्टमध्ये तिला मुंबई विमानतळावर आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. तिने तिथली परिस्थिती व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून दाखवून संताप व्यक्त केला आहे.

"Passengers including babies, elderly were locked up for hours"; Radhika Apte's anger over the poor management of Mumbai Airport | "लहान बाळं, वृद्धांसह प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय"; मुंबई एअरपोर्टच्या ढिसाळ कारभारावर राधिकाचा संताप

"लहान बाळं, वृद्धांसह प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय"; मुंबई एअरपोर्टच्या ढिसाळ कारभारावर राधिकाचा संताप

अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) अभिनयाव्यतिरिक्त बेधडक विधानांमुळे चर्चेत येत असते. तसेच बऱ्याचदा ती सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसते आणि तिच्या पोस्टही चर्चेत येत असतात. दरम्यान आता तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. तिने पोस्टमध्ये तिला मुंबई विमानतळावर आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. तिने तिथली परिस्थिती व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून दाखवून संताप व्यक्त केला आहे. 

राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर मुंबई एअरपोर्टवरील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यात लोकांना बंद केलेले पाहायला मिळत आहे. तसेच राधिका फ्लाइटची वाट पाहत खाली बसलेली दिसत आहे. यावेळी तिने तोंडावर मास्क लावलेला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, मला हे पोस्ट करावे लागले! आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाइट होती. आता १०:५० वाजले आहेत आणि फ्लाइट अजूनही आलेली नाही. पण फ्लाइटच्या क्रुने सांगितले की आम्ही बोर्डिंग करत आहोत आणि सर्व प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवले आणि लॉक केले! 

तिने पुढे म्हटले की, लहान बाळे, वृद्धांसह प्रवासी तासाभरापासून कोंडून आहेत. सुरक्षा दरवाजे उघडणार नाही. कर्मचार्‍यांनाही पूर्णपणे माहिती नाही! त्यांचा क्रूदेखील आत आलेला नाही. क्रूमध्ये बदल झाला होता आणि ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत परंतु ते कधी येतील याची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे  किती काळ आत लॉक ठेवले जाईल हे कोणालाही माहिती नाही. बाहेरील अत्यंत मूर्ख कर्मचारी महिलेशी बोलण्यासाठी मी पळून जाण्यात यशस्वी झाले. पण ती काही अडचण येणार नाही आणि उशीर होत नाही असे सांगत होती. आता मी आत बंद आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही दुपारी १२ वाजेपर्यंत येथे असे बंद असू. तोपर्यंत पाणी नाही लू नाही. मजेदार प्रवासाबद्दल धन्यवाद!!

पोस्टवर कलाकारांच्या प्रतिक्रिया
कोंकणा सेन शर्माने लिहिले की, अविश्वसनीय. अभिनेता सुयश टिळकने लिहिले की,मुंबई विमानतळ अशक्य होत चालले आहे. अक्षरा हसनने म्हटले की, मुंबई विमानतळावर स्वागत. हेहेहेहे. असे असले तरी हे पहिल्यांदाच घडलेले नाही. अभिनेत्री अमृता सुभाषने लिहिले की, अरे देवा.

Web Title: "Passengers including babies, elderly were locked up for hours"; Radhika Apte's anger over the poor management of Mumbai Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.