शाहरुख खानच्या 'पठाण'ने साऊथमध्येही जबरदस्त कमाई केली! केरळमध्ये बनला नंबर 1 बॉलीवूड चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 05:42 PM2023-02-05T17:42:09+5:302023-02-05T17:42:17+5:30

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने 'पठाण' या चित्रपटातून कमबॅक केले आहे.  तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुखने 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील जुने रेकॉर्ड मोडले आहेत.

pathaan becomes top bollywood grosser in kerala shah rukh khan starrer collects big from south | शाहरुख खानच्या 'पठाण'ने साऊथमध्येही जबरदस्त कमाई केली! केरळमध्ये बनला नंबर 1 बॉलीवूड चित्रपट

शाहरुख खानच्या 'पठाण'ने साऊथमध्येही जबरदस्त कमाई केली! केरळमध्ये बनला नंबर 1 बॉलीवूड चित्रपट

googlenewsNext

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने 'पठाण' या चित्रपटातून कमबॅक केले आहे.  तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुखने 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील जुने रेकॉर्ड मोडले आहेत. भारतात 400 कोटींचे निव्वळ कलेक्शन आणि जगभरात 750 कोटी कमाई असलेला 'पठाण' हा शाहरुखच्या कारकिर्दीतील केवळ सर्वात मोठा चित्रपट नाही, तर तो 11 दिवसांत बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. शनिवारच्या कलेक्शनसह, 'पठाण'ने आमिर खानच्या 'दंगल'चा विक्रम मोडला आहे, ज्याने 387 कोटींची कमाई करून भारतातील सर्वात मोठा बॉलीवूड चित्रपट होता.

'पठाण'चित्रपटाने बॉलीवूडच्या चित्रपटांना पुन्हा एकदा संजीवनी दिली आहे. शाहरुखचा चित्रपट लवकरच परदेशात 300 कोटींचा गॉस कलेक्शन गाठणार आहे, तर या चित्रपटाने साऊथमध्येही चांगली कमाई केली आहे. 'पठाण'चे तेलुगु-तमिळ कलेक्शन भारतात शनिवारपर्यंत 'पठाण'चे नेट कलेक्शन 378.15 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये फक्त हिंदी व्हर्जनमधून चित्रपटाची कमाई 364.50 कोटी आहे. उर्वरित 13.65 कोटी रुपये 'पठाण'च्या तामिळ आणि तेलुगू व्हर्जनमधून आले आहेत. 

दक्षिणेतील लोकांनी फक्त हिंदीत 'पठाण' जास्त पाहिले आहेत. दिल्लीत तमिळ चित्रपट 'विक्रम' चे शो अनेकांनी तमिळमध्ये पाहिले. म्हणूनच केवळ डबिंग व्हर्जनचे कलेक्शन मिळवूनच चित्रपटाचा दाक्षिणात्य परफॉर्मन्स सांगता येत नाही.

तमिळ-तेलुगू व्यतिरिक्त दक्षिणेच्या प्रेक्षकांना हिंदीतही चित्रपट पाहण्याचा पर्याय उपलब्ध होता. SacNilk च्या मते, 'पठाण' च्या ऑनलाइन शोच्या उपलब्ध डेटावरून असे दिसून येते की, पहिल्या दिवशी बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई विभागातील जवळपास 1500 हिंदी शोमध्ये चित्रपटाची सरासरी व्याप्ती 64% पेक्षा जास्त होती. 'पठाण'साठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या मुंबईतील 1575 हिंदी शोची व्याप्ती 38.50% होती. 11व्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या शनिवारी 'पठाण'च्या हिंदी शोचा डेटाही या ट्रेंडचा पुरावा देतो. 

Kangana Ranaut : “हे भीतीदायक...तो माझ्यावर पाळत ठेवतोय...”, कंगनाचे रणबीर-आलियावर गंभीर आरोप?

हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई येथे चित्रपटाच्या जवळपास 790 हिंदी शोची सरासरी व्याप्ती 41% पेक्षा जास्त होती. तर मुंबईतील 1143 शोची ऑक्युपन्सी 18% होती. डेटावरून असेही दिसून आले आहे की 'पठाण'च्या पहिल्या दिवसापासून ते 11व्या दिवसापर्यंत, दक्षिणेकडील या तीन प्रदेशातील तमिळ आणि तेलुगू शो हिंदी शोच्या तुलनेत निम्मेही नाहीत.

Web Title: pathaan becomes top bollywood grosser in kerala shah rukh khan starrer collects big from south

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.