Pathaan Movie : कोट्यधीश 'पठाण'! 40 व्या दिवशीही घोडदौड सुरुच, अक्षयचा 'सेल्फी' मात्र आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 12:29 PM2023-03-06T12:29:35+5:302023-03-06T12:31:22+5:30

४० दिवस झाले तरी 'पठाण'चे सिनेमागृहात शो सुरुच आहेत.

pathaan box office collection continues on day 40 whereas akshay kumar film flop | Pathaan Movie : कोट्यधीश 'पठाण'! 40 व्या दिवशीही घोडदौड सुरुच, अक्षयचा 'सेल्फी' मात्र आपटला

Pathaan Movie : कोट्यधीश 'पठाण'! 40 व्या दिवशीही घोडदौड सुरुच, अक्षयचा 'सेल्फी' मात्र आपटला

googlenewsNext

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण'ची घौडदौड अजुनही सुरुच आहे. आज ४० व्या दिवशीही पठाण बॉक्सऑफिसवर तग धरुन आहे. गेल्या २ वर्षांतील बॉलिवूडमध्ये झालेली ही रेकॉर्डब्रेक कामगिरीच म्हणावी लागेल. तसेच यासोबत पठाणने बॉलिवूडचे बुडते जहाज वर आणले आहे. मात्र दुसरीकडे अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'सेल्फी'ला जबर धक्का बसला आहे. 

पठाणचा कोटींचा गल्ला

२५ जानेवारी रोजी 'पठाण' जगभरात रिलीज झाला. या सिनेमातून शाहरुख खान ४ वर्षांनी चाहत्यांच्या भेटीला आला. त्यामुळे शाहरुखला सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या तर चाहतेही त्याला बघायला उत्सुक होते. ४० दिवस झाले तरी 'पठाण'चे सिनेमागृहात शो सुरुच आहेत. पठाणने आतापर्यंत जगभरात १०३३ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर भारतात सिनेमाने आतापर्यंत ५३२ कोटींची कमाई केली आहे.

मेकर्सने दिल्या ऑफर्स 

पठाणने ३९ व्या दिवशी एकूण २ कोटींची कमाई केली. दिवसेंदिवस फिल्मचे कलेक्शन बघतचा मेकर्सकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. ११० रुपयात तिकीट किंवा 'बाय वन गेट वन फ्री' या ऑफर्समुळे सिनेमा अजुनही बक्कळ कमाई करतोय.

सेल्फीची वाईट परिस्थिती 

Deepika Padukone : “शाहरूख व मी…”; 'पठाण'च्या 'बेशरम रंग' वादावर पहिल्यांदाच बोलली दीपिका पादुकोण

एकीकडे पठाणची चलती आहे तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमार मात्र सतत फ्लॉप ठरतोय. त्याचा नुकताच रिलीज झालेला 'सेल्फी' सिनेमा जोरदार आपटला आहे. आतापर्यंत सिनेमाने एकूण १५ कोटी ५२ लाख रुपयांचाच बिझनेस केला.

Web Title: pathaan box office collection continues on day 40 whereas akshay kumar film flop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.