Pathaan च्या controversy चा सिनेमालाच होतोय फायदा, आता कसला होतोय बॉयकॉट; सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 13:46 IST2022-12-22T13:45:10+5:302022-12-22T13:46:16+5:30

शाहरुख दीपिकाच्या पठाण सिनेमाची चर्चाच एवढी होत आहे की आता काय सिनेमा बॉयकॉट होतोय अशी शंकाच निर्माण झाली आहे.

pathaan-controversy-jhoomein-jo-pathaan-crossed-2-million-views-in-1-hour | Pathaan च्या controversy चा सिनेमालाच होतोय फायदा, आता कसला होतोय बॉयकॉट; सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ

Pathaan च्या controversy चा सिनेमालाच होतोय फायदा, आता कसला होतोय बॉयकॉट; सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ

Pathaan : शाहरूख खान ( Shah Rukh Khan ) व दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाचं पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) रिलीज झालं आणि या गाण्यावरून कधी नव्हे इतका राडा झाला. हा वाद अजूनही सुरूच असताना आता ‘पठाण’चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ (Jhoome Jo Pathaan) असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यानं रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका तासातच गाण्याला २ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. 

कॉंट्रोव्हर्सीचा फायदाच 

पठाणच्या बेशरम रंग गाण्याचा वाद सुरु झाला आणि याचा गाण्याला एकप्रकारे फायदाच झाला. बेशरम रंग गाण्याला १०० मिलियन व्ह्युज मिळाले. आता पठाण च्या दुसऱ्या गाण्यालाही याचा फायदा झाला आहे. कारण काही तासांतच 'झूमे जो पठाण' ला २ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

हा कसला बॉयकॉट 

शाहरुख दीपिकाच्या पठाण सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची चर्चाच एवढी होत आहे की आता काय सिनेमा बॉयकॉट होतोय अशी शंकाच निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर शाहरुखचे चाहते तुटून पडले आहेत. भक्तांनो या आता आणि बघा झूमे जो पठाण, बॉयकॉट साठी आणखी एक विषय शोधा, दोन पैसे तरी मिळतील. 

गाण्यात शाहरूख व दीपिकाचा किलर अवतार बघण्यासारखा आहे. दोघांचा डान्सही तितकाच किलर आहे. दीपिका नेहमीप्रमाणे बोल्ड लुकमध्ये दिसतेय. या गाण्यातील सगळ्यात खास बात म्हणजे, शाहरूखची आयकॉनिक डान्स पोझ यामध्ये बघायला मिळतेय. विशाल-शेखरने संगीतबद्ध केलेलं हे गाणं अरिजीत सिंग, सुकृति कुमारने गायलं आहे.

Web Title: pathaan-controversy-jhoomein-jo-pathaan-crossed-2-million-views-in-1-hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.