Pathaan Movie : बॉलिवूडच्या पठाणला काश्मीरमधून शुभेच्छा, 'काश्मीरी' तरुणांनी शेअर केला शाहरुखसाठी खास व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:57 PM2023-01-10T14:57:38+5:302023-01-10T14:57:56+5:30
बॉलिवूडच्या बादशाहला काश्मीरमधूनही शुभेच्छा मिळाल्या आहेत. काश्मीरी तरुणांनी शाहरुखसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे.
Pathaan Movie : यशराज फिल्म्सच्या आगामी 'पठाण' या सिनेमाचे बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाले. पॉवरपॅक अॅक्शनसह शाहरुख 4 वर्षांनी मोठया पडद्यावर येतोय. शाहरुखचे चाहते तर पठाण ची मनापासून वाट पाहत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर तर चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे. बॉलिवूडच्या बादशाहला काश्मीरमधूनही शुभेच्छा मिळाल्या आहेत. काश्मीरी तरुणांनी शाहरुखसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे.
'पठाण'चे ट्रेलर प्रदर्शित झाले आणि काही वेळातच ट्रेलर ला लाखो व्ह्यूज मिळाले. 'किंग इज बॅक, बॉलिवूडला आता शाहरुखच वाचवू शकेल' अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. दरम्यान शाहरुख खान वॉरियर्स फॅन क्लब या ट्विटर हॅंडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काश्मीरच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत किंग खानला शुभेच्छा दिल्या आहेत. बच्चे, बुढे और जवान, सब देखेंगे पठाण.' जय हिंद फ्रॉम काश्मीर असे ट्वीट त्यांनी केले आहे.
"Bache budhe aur Jawan, Sab Dekhenge #Pathaan!"
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) January 10, 2023
: @RafiqNathani2 & Team says, Jai Hind from Kashmir ❤️#PathaanTrailer#ShahRukhKhan#DeepikaPadukone#JohnAbraham#YRF50#SiddharthAnandpic.twitter.com/aN417LMRjR
या व्हिडिओत काही काश्मीरी तरुण आहेत. बर्फात उभे राहून त्यांनी पठाणचे पोस्टर हातात धरले आहे. सर्व काश्मीरी तरुण घोषणाही देत असल्याचं दिसत आहे.
'बेशरम रंग' हे पठाणचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आणि वाद सुरु झाला होता. गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकीनीवर आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले. आता ट्रेलरमध्ये बेशरम रंग चा वेगळा शॉट दाखवण्यात आला आहे. तसेच काही डायलॉग बदलही लक्षात येत आहेत. पठाण फुल एंटरटेनमेंट पॅकेज असणार हे मात्र नक्की.
तर या ट्रेलरमुळे आता चाहत्यांची उस्तुकता आणखी वाढली आहे. डॉन नंतर पुन्हा शाहरुख खानला अॅक्शन सीक्वेन्स करताना बघायला मिळणार आहे. यासाठी चाहत्यांना २५ जानेवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे.