Pathaan: 'पठाण' पोहचला पाकिस्तानात! लपून-छपून दाखवला जातोय शाहरुख खानचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 07:20 PM2023-02-01T19:20:48+5:302023-02-01T19:21:40+5:30

Pathaan : शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची क्रेझ पाकिस्तानात पोहोचली आहे. कराची शहरात पठाणचे अवैध स्क्रिनिंग करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Pathaan: 'Pathan' has arrived in Pakistan! Shah Rukh Khan's movie is being shown secretly | Pathaan: 'पठाण' पोहचला पाकिस्तानात! लपून-छपून दाखवला जातोय शाहरुख खानचा सिनेमा

Pathaan: 'पठाण' पोहचला पाकिस्तानात! लपून-छपून दाखवला जातोय शाहरुख खानचा सिनेमा

googlenewsNext

शाहरुख खान(Shahrukh Khan)च्या पठाण (Pathaan) या चित्रपटाने भारतात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची क्रेझ देशभरातच नाही तर पाकिस्तानात पोहोचली आहे. हा चित्रपट अद्याप पाकिस्तानात अधिकृतपणे प्रदर्शित झाला नसला तरी पठाण शेजारील देशातील कराची शहरात प्रदर्शित करण्यात आला आहे. तेही सरकारी विभागात.

पठाण पाकिस्तान वगळता भारतासह अनेक देशांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने ६ दिवसात ६०० कोटींचा आकडा पार केला आहे. पठाणची जगभरात चर्चा होत आहे. त्याचबरोबर शाहरुख खानची क्रेझही पाहायला मिळत आहे. कदाचित त्यामुळेच पाकिस्तानातील लोकांनाही हा चित्रपट पाहावासा वाटला असेल. आता हा चित्रपट अधिकृतरीत्या आपल्या देशात प्रदर्शित झाला नसल्यामुळे, तो दाखवण्याचा दुसरा मार्ग त्याने शोधला आहे.

डॉनमधील वृत्तांवर विश्वास ठेवला तर, फेसबुकवर एक जाहिरात पोस्ट करण्यात आली होती की पठाण कराचीमध्ये प्रदर्शित केला जाईल. या जाहिरातीत तिकिटाची किंमत ९०० रुपये नमूद करण्यात आली होती. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जाहिरात पोस्ट झाल्यानंतर लगेचच लोकांनी पठाण चित्रपट पाहण्यात रस दाखवला. काहींनी चित्रपटाच्या लोकेशन आणि दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी पाकिस्तानमधील प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित केले.

सरकारी एरियात स्क्रिनिंग
चित्रपटाचा दर्जा आणि स्थळ याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना लगेचच उत्तरे देण्यात आली. हा चित्रपट डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमध्ये दाखवला जाईल, तर तो एचडीमध्ये नसून तो स्पष्ट दर्जाचा असेल, असे उत्तरात म्हटले होते. दुसरीकडे बंदी असतानाही दाखवण्यात येत असल्याच्या प्रश्नावर केवळ संपर्क क्रमांक देण्यात आला असून, फोन करून माहिती घेण्यास सांगण्यात आले. ज्या कंपनीने हे स्क्रिनिंग आयोजित केले त्या कंपनीचे नाव फायरवर्क इव्हेंट्स आहे, ज्याचा शोध घेतल्यावर कळले की ती यूके स्थित कंपनी आहे.
यानंतर थोड्याच वेळात त्याच पेजवरुन आणखी एक घोषणा केली, ज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या शोची सर्व तिकिटे आरक्षित झाल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी चाहत्यांच्या मागणीनुसार ते दोन अतिरिक्त शो चालवणार आहेत. जे रविवारी संध्याकाळी ४.३० ते ७.३० आणि रात्री ८ ते ११ या वेळेत चालेल. जेव्हा या शोचे ठिकाण निश्चित केले गेले, तेव्हा एक खयाबान-ए-शाहबाजच्या व्यावसायिक भागात असल्याचे निष्पन्न झाले आणि दुसरे अद्याप ठरलेले नाही. त्यानंतर रविवारचे स्क्रिनिंग हलवून शुक्रवार, ३ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगण्यात आले.

भारतीय चित्रपटांवर बंदी
फेब्रुवारी २०१९ मध्ये, चित्रपट प्रदर्शक समुदायाने पाकिस्तानमध्ये कोणताही भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटावर बंदी असतानाही पठाणच्या बेकायदेशीर प्रदर्शनाची बातमी ही एक गंभीर बाब आहे. कारण चार वर्षांनंतरही पाकिस्तानात अधिकृतपणे एकही भारतीय चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

Web Title: Pathaan: 'Pathan' has arrived in Pakistan! Shah Rukh Khan's movie is being shown secretly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.